मुंबई : रॉयल चॅलेंजर बंगळूरू टीम 12 मार्च रोजी त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा करणार आहेत. गेल्या वर्षी विराट कोहलीने कर्णधार पद सोडलं होतं. त्यामुळे यावर्षी आरसीबीला नवा कर्णधार मिळणार आहे. 26 मार्च रोजी आयपीएलच्या 15व्या सिझनला सुरुवात झाली आहे. तर या सिझनचा फायनला सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे.
तर आता आरसीबीचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. यावेळी पुन्हा कोहली कर्णधार बनणार का असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस आरसीबीचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहेत. मात्र फ्रँचायझीने डू प्लेसिसला टीमचा नवा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे टीम त्यांनी नवी जर्सी देखील लाँच करणार आहे.
ग्लेन मॅक्सवेस सध्या लग्नाच्या गडबडीत आहे. त्यामुळे मॅक्सवेल आयपीएलचे पहिले काही सामने खेळणार नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत फॅफ डू प्लेसिस हा कर्णधारपदासाठी उत्तम पर्याय आहे.
आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये RCB ने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज फाफ डू प्लेसिसला 7 कोटींना विकत घेतलं आहे. फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाल्यानंतर कर्णधारपदाची धुरा त्याच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता तेव्हा वर्तवण्यात येत होती.
दरम्यान क्रिकइन्फोशी बोलताना डॅनियल व्हिटोरी म्हणाले, "विराट पुन्हा आरसीबीचा कर्णधार होणार नाही. फ्रँचायझी क्रिकेट किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, एकदा कर्णधार गेला की, त्याव्यतिरीक्त वेगळ्या नावाचा विचार करणं योग्य असतं."