Team India : दाढी-मिशांविना विराट कोहलीचा फोटो व्हायरल; चाहते हैराण

Team India : पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया ( Team India ) पूर्णपणे तयार आहे. अशातच टीम इंडियातील खेळाडूंचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून चाहते हैराण झालेत कारण, हे फोटो दाढी-मिशांविना आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 19, 2023, 06:13 PM IST
Team India : दाढी-मिशांविना विराट कोहलीचा फोटो व्हायरल; चाहते हैराण title=

Team India : 20 जुलै रोजी भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( Ind Vs WI ) यांच्यात दुसरा टेस्ट सामना रंगणार आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया ( Team India ) पूर्णपणे तयार आहे. मात्र दुसऱ्या सामन्यापूर्वी चाहत्यांना धक्का देणारे टीम इंडियातील खेळाडूंचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून चाहते हैराण झालेत कारण, हे फोटो दाढी-मिशांविना आहेत. 

शेवटची आणि दुसरा टेस्ट सामना Queen's Park Oval वर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा ( Virat Kohli ) एक फोटो समोर आलाय. ज्यामध्ये हे दोघंही दाढी आणि मिशांशिवाय दिसतायत. 

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WI vs IND) या दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी समोर आलेले विराट कोहली ( Virat Kohli ) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचे हे फोटो खरे चित्र नाहीयेत. हे फोटो एडिटेड असून या फोटोमध्ये हे खेळाडू दाढी आणि मिशाशिवाय दिसत आहे. शिवाय या दोघांसोबत केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवही त्याच्यासोबत दिसत आहेत.

टीम इंडियाच्या चार खेळाडूंचे हे फोटो व्हायरल होत असून प्रमुख आकर्षण ठरला किंग कोहली. याचं कारण असं की, चाहत्यांना तो दाढी आणि मिशांमध्ये जास्त आवडतो. क्लिन शेव्ह केलेला कोहलीचा ( Virat Kohli ) फोटो पाहून चाहते मात्र चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत.  

विराट कोहली रचणार नवा विक्रम

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WI vs IND) हा दुसरा टेस्ट सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 500 वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. या सामन्याद्वारे विराट कोहली ( Virat Kohli ) हा भारताकडून 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा चौथा खेळाडू ठरणार आहे. विराटपूर्वी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि राहुल द्रविड यांनी 500 टेस्ट सामने खेळलेत. सचिनने आपल्या कारकिर्दीत 664 सामने खेळले. धोनीने 538 सामने खेळले असून टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक द्रविडने 509 सामने खेळले आहेत.

चाहत्यांच्या कोहलीकडून मोठ्या अपेक्षा

पहिल्या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli ) चांगली खेळी केली. डॉमिनिका टेस्ट सामन्यात त्याने 182 बॉल्समध्ये 76 रन्स केले. पहिल्या सामन्यात तो सेंच्युरी झळकावू शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहली शतक झळकावेल, अशी अशा भारतीय चाहत्यांना आहे.