नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानात अनेक रेकॉर्ड करत आहे. त्याच्या पराक्रमांमुळे त्याचे खेळाडू म्हणूनच नाही तर कर्णधार म्हणूनही कौतुक होत आहे.
विराटने ६६ कसोटी सामन्यात ८ वेळा नाबाद राहात ५५५४ धावा केल्या आहेत. यात २१ शतकं, १६ अर्धशतकं आणि ६ दुहेरी शतकांचा समावेश आहे. तर २०८ वनडे सामन्यात ३५ वेळा नाबाद राहत विराटने ९५८८ धावांची कामगिरी केली आहे. वनडे मॅचमध्ये कोहलीने ३५ शतकं, ४६ अर्धशतकं केली आहेत. टी२० मध्ये कोहली ५८ सामन्यांमध्ये १८ अर्धशतकांच्या मदतीने १९८३ धावा बनवल्या आहेत.
या रेकॉर्डबरोबरच विराटची फॅशन स्टेटमेंट किंवा स्टाईल तरुणाईला नेहमीच भावते. कारण त्याकडेही तो विशेष लक्ष देतो. मग त्याची दाढीची स्टाईल असो, हेयरस्टाइल असो किंवा टॅटू या सगळ्याची तरुणाईला चांगलीच भूरळ पडली आहे.
एका रिपोर्टनुसार, गेल्या वर्षातील १४४ मिलियन अमेरिकन डॉलर्सची ब्रॅंड व्हॅल्यू असलेला विराट हा भारतातील सर्वात महागडा सेलिब्रेटी आहे. ब्रॅंड व्हॅल्यूच्या बाबतीत विराटने अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना मागे टाकले आहे.
त्यामुळेच की काय पण विराटला महागड्या वस्तू खरेदी करण्याची आवड आहे. अलिकडेच विराट एअरपोर्टवरून बाहेर येत असताना त्याच्याकडचे वॉलेट निदर्शनास आले. विराटच्या हातातील हे काळ्या रंगाचे वॉलेट जगातील सर्वात महागड्या वॉलेटपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या या ब्रॅंडेड वॉलेटची किंमत ऐकून तुम्ही चाट पडाल. विराटकडे Louis Vuitton Zippy XL या ब्रॅंडचे वॉलेट आहे. मेन्सएक्सपीच्या रिसर्चनुसार या वॉलेटची किंमत $1,250 म्हणजेच सुमारे ८१,१४४ रुपये डॉलर आहे.
क्रिकेट खेळण्याबरोबच जाहिरातींमधूनही विराट जबरदस्त कमाई करतो.