मुंबई : इंडियन प्रीमियर लीग-2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अनेक मोठ्या खेळाडूंना कायम ठेवण्यात आलेलं नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांसारखी भारतीय क्रिकेटमधील मोठी नावं आपल्या टीमने सोबत ठेवली आहेत.
पण काही खेळाडूंना रिटेन्शनचाही फटका बसला आहे. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे.
महेंद्रसिंग धोनी : चेन्नई सुपर किंग्जची ओळख बनलेल्या एमएस धोनीने भविष्यातील तयारी लक्षात घेऊन रवींद्र जडेजाला पुढे केलं आहे. एमएस धोनीला कायम ठेवण्यासाठी 12 कोटी रुपये मिळाले आहेत. तर आधी त्याचा पगार 15 कोटी रुपये होती.
विराट कोहली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडलेल्या विराट कोहलीला यावेळी पगाराच्या बाबतीतही काहीसा तोटा सहन करावा लागला आहे. विराट कोहलीला रिटेन्शन लिस्टमध्ये 15 कोटी रुपये मिळाले आहेत, तर आतापर्यंत त्याचा पगार 17 कोटी रुपये होता.
ग्लेन मॅक्सवेल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोहलीशिवाय मॅक्सवेलला रिटेन केलं आहे. यावेळी एबी डिव्हिलियर्स नसल्यामुळे तेच मोठे विदेशी खेळाडू आरसीबीसोबत आहेत. ग्लेन मॅक्सवेलला आतापर्यंत 14.25 कोटी रुपये मिळत होते, मात्र यावेळी त्याला केवळ 11 कोटी रुपये रिटेनशनमध्ये मिळत आहेत.
सुनील नरेन : कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू सुनील नरेनचा यावेळी मोठा तोटा झाला आहे. गेल्या सीझनपर्यंत सुनील नरेनची फी 12.5 कोटी होती, मात्र यावेळी रिटेन्शन लिस्ट आली तेव्हा त्याला फक्त 6 कोटी मिळणार आहेत.
1. रवींद्र जडेजा- 16 कोटी
2. रोहित शर्मा- 16 कोटी
3. ऋषभ पंत- 16 कोटी
4. विराट कोहली- 15 कोटी
5. केन विलियमसन-14 कोटी
6. संजू सैमसन- 14 कोटी
7. मयंक अग्रवाल- 12 कोटी
8. जसप्रीत बुमराह- 12 कोटी
9. आंद्रे रसेल- 12 कोटी
10. एमएस धोनी- 12 कोटी
11. ग्लेन मैक्सवेल- 11 कोटी
12. जोस बटलर- 10 कोटी