नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं खणखणीत द्विशतक झळकावलं. टेस्ट क्रिकेटमधलं विराटचं हे पाचवं द्विशतक तर १९वं शतक होतं. या द्विशतकाबरोबरच विराटनं अनेक रेकॉर्डही केली आहे.
विराट कोहली सगळ्यात जलद शतक मारणाऱ्या कॅप्टनच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीमध्ये विराटनं सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. विराट कोहलीनं १९वं शतक १०४ इनिंगमध्ये पूर्ण केलं. एवढी शतक झळकवायला सचिन तेंडुलकरला १०५ इनिंग लागल्या होत्या. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे महान बॅट्समन सर डॉन ब्रॅडमन आहेत. ब्रॅडमन यांनी ५३ इनिंगमध्ये एवढी शतकं केली होती.
कॅप्टन असताना सर्वाधिक द्विशतकं झळकवणाऱ्यांच्या यादीमध्ये विराटनं लाराच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. कॅप्टन म्हणून विराटनं ५ द्विशतकं केली आहेत तर लाराचीही एवढीच द्विशतकं आहेत. कॅप्टन असताना ब्रॅडमन, मायकल क्लार्क आणि ग्रॅम स्मिथ यांनी ४ द्विशतकं झळकावली होती.
वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ द्विशतकं लगावली आहेत. या यादीमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट आणि द्रविडनं ५ द्विशतकं तर गावस्कर यांनी ४ आणि चेतेश्वर पुजारानं ३ द्विशतकं झळकावली आहेत.
सर डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)- ५३ इनिंग
सुनील गावस्कर (भारत)- ८५ इनिंग
मॅथ्यू हेडन(ऑस्ट्रेलिया)- ९४ इनिंग
स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)- ९७ इनिंग
विराट कोहली(भारत)- १०४ इनिंग
सचिन तेंडुलकर(भारत)- १०५ इनिंग
कॅप्टन म्हणून सर्वाधिक ११ शतकांचा रेकॉर्ड सुनील गावस्कर यांच्या नावावर होत्या. गावस्करांच्या या रेकॉर्डची बरोबरी विराटने कोलकाता टेस्ट मॅचमध्ये केली होती. मात्र, आता नागपूर टेस्ट मॅचमध्ये पुन्हा एक शतक लगावत विराटने गावस्करांनाही मागे टाकलं आहे. या यादीमध्ये विराट, गावस्कर यांच्यानंतर नाव आहे ते म्हणजे मोहम्मद अझहरुद्दीन यांचं. अझहरुद्दीननं कॅप्टन असताना ९ टेस्ट शतकं केली होती.
विराट कोहली- १२ शतकं, ४९ इनिंग
सुनील गावस्कर- ११ शतकं, ७४ इनिंग
मोहम्मद अजहरुद्दीन- ९ शतकं, ६८ इनिंग
सचिन तेंडुलकर- ७ शतकं, ४३ इनिंग
कॅप्टन असताना एका वर्षात सर्वाधिक शतकं लगावण्याचं ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगचं रेकॉडही विराटनं मोडलं आहे. यंदाच्या वर्षात विराट कोहलीनं १० शतकं लगावली आहेत.
विराट कोहली- १० शतकं(२०१७)
रिकी पॉटिंग- ९ शतकं(२००५)
ग्रॅम स्मिथ- ९ शतकं(२००५)
रिकी पॉटिंग- ९ शतकं(२००६)