शिखर धवनला वेस्ट इंडिजच्या बॉलरचं 'जशास तसं' उत्तर

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि अंबाती रायडूनं शानदार शतक केलं.

Updated: Oct 29, 2018, 10:09 PM IST
शिखर धवनला वेस्ट इंडिजच्या बॉलरचं 'जशास तसं' उत्तर title=

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा २२४ रननं विजय झाला. रोहित शर्मा आणि अंबाती रायडूनं शानदार शतक केलं. रोहितचं हे वनडेमधलं २१वं तर अंबाती रायडूचं तिसरं शतक होतं. रोहितनं १३७ बॉलमध्ये १६२ रनची खेळी केली. यामध्ये २० फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. रायुडूनं ८१ बॉलमध्ये १०० रन केले. यामध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवननं भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहित आणि शिखरमध्ये ७१ रनची पार्टनरशीप झाली. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही शिखर धवनला मोठी खेळी करता आली नाही. धवन ४० बॉलमध्ये ३८ रन करून आऊट झाला.

कीमो पॉलच्या बॉलिंगवर कायरन पॉवेलला कॅच देऊन शिखर धवन आऊट झाला. शिखर धवनची विकेट घेतल्यानंतर कीमो पॉलनं शिखर धवन करतो तसंच सेलिब्रेशन केलं. शिखरची विकेट घेतल्यानंतर किमो पॉलनं गब्बर स्टाईल सेलिब्रेशन केलं. आत्तापर्यंत क्रिकेटच्या मैदानात शिखर धवनकडूनच अशाप्रकारचं सेलिब्रेशन पाहिलं जातं. पण किमो पॉलच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

याआधी वेस्ट इंडिजचा बॉलर अॅशले नर्सनंही शिखर धवनची विकेट घेतल्यानंतर त्याला चि़डवलं होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये नर्सनं धवनची विकेट घेतली होती. या दोन्ही वेळी नर्सनं कपील शर्माच्या अंदाजात 'बाबाजी का ठुल्लू' करत शिखर धवनवर निशाणा साधला होता. दुसऱ्या वनडेमध्ये धवन २९ रनवर आणि तिसऱ्या वनडेमध्ये ३५ रनवर आऊट झाला होता. पहिल्या वनडेमध्ये धवनला ४ रनच करता आल्या होत्या.