Wrestlers Protest: 'रुमचा दरवाजा उघडाच ठेवायचे अन् माझ्यासोबत...', विनेश फोगटने सांगितला हृदयद्रावक अनुभव!

Indian wrestlers protest: जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला जायचो, त्यावेळी नियमांच्या विरोधात जाऊन ब्रिजभूषण  (brij bhushan sharan singh) हे खेळाडूंच्याच हॉटेलमध्ये थांबायचे.

Updated: Jan 19, 2023, 08:30 PM IST
Wrestlers Protest: 'रुमचा दरवाजा उघडाच ठेवायचे अन् माझ्यासोबत...', विनेश फोगटने सांगितला हृदयद्रावक अनुभव! title=
wrestlers protest,Vinesh Phogat

Wrestlers Protest, Vinesh Phogat: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (brij bhushan sharan singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेल्यावर खेळाडूंचं कशाप्रकारे शोषण (sexual harassment) करण्यात येत होतं, यावर बोलताना अनेक खेळाडूंनी संताप व्यक्त केला. त्यावेळी बोलताना भारताला गोल्ड मेडल पटकावून देणारी गोल्डन गर्ल विनेश फोगाटने खळबळजनक आरोप केले आहेत. (Vinesh Phogat accuses Wrestling Federation president of sexual harassment as top wrestlers protest at Jantar Mantar)

जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला जायचो, त्यावेळी नियमांच्या विरोधात जाऊन ब्रिजभूषण हे खेळाडूंच्याच हॉटेलमध्ये थांबायचे. ब्रिजभूषण (brij bhushan sharan singh) महिला खेळाडूंच्या मजल्यावरच आपली रुम बूक करायचे. मुद्दामहून ते आपल्या रुमचा दरवाजा उघडाच ठेवायचे. ज्यावेळी माझा टोकिओ ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पराभव झाला, त्यावेळी त्यांनी मला तुझं नाणं खोटं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

त्यांनी माझा मानसिक छळही (Mental Torture) केलाय. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत होता. माझी हत्या देखील होऊ शकते. जर माझी हत्या झाली तर त्यासाठी ब्रिजभूषण जबाबदार असतील, असं खळबळजनक वक्तव्य विनेश फोगाटने (Vinesh Phogat On brij bhushan sharan singh) केलं आहे.

आणखी वाचा- Wrestlers Protest: आता सुट्टी नाही! ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप, पैलवानांनी थोपटले दंड

आमच्या जीवालाही धोका आहे. आम्ही पोलिस संरक्षणही (Police protection) घेतलेलं नाही. अध्यक्षांच्या घराला कुलूप आहे. ज्या मुलींवर अत्याचार झाले ते स्वतः पुरावे आहेत. आम्ही कुस्ती (Wrestlers Protest) सोडून इथं आलोय. अध्यक्ष महोदय तुम्ही पद कधी सोडताय? असा सवाल विनेश फोगाटने विचारला आहे. सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर न्यायाची अपेक्षा कुस्तीपट्टूंना आहे.

दरम्यान, कुस्ती फेडरेशनचे विशेष प्रशिक्षक (WFI Coach) आमच्यावर अत्याचार करतात. राष्ट्रीय शिबिरात महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केलं जातं, त्यानंतर तक्रार करूनही कारवाई होत नाही, असा गंभीर आरोप करण्यात आलाय. टोकियो ऑलिम्पिकनंतर आम्ही पंतप्रधानांकडे (PM Narendra Modi) तक्रार केली होती, त्यांनी काही होणार नाही, असं आश्वासन देण्यात आलं होतं, असंही कुस्तीपटू सांगत आहेत.