मुंबई : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्हो फक्त त्याच्या मैदानातल्या खेळामुळेच नाही तर त्याच्या डान्स आणि गाण्यांमुळेही प्रसिद्ध आहे. युएईमध्ये पार पडलेल्या टी-१० क्रिकेट लीगमध्ये ब्राव्हो मराठा अरेबियन्सकडून खेळला. यातल्याच एका मॅचमध्ये ब्राव्हो विकेट घेतल्यानंतर वेगळ्याच अंदाजात थिरकला. ब्राव्होचा जल्लोष बघून बॅट्समनही स्वत:चं हसणं रोखू शकला नाही.
ड्वॅन ब्राव्होच्या या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ब्राव्हो चिकनसारखा डान्स करताना दिसत आहे. टी-१० क्रिकेट लीगमध्ये कॅच पकडल्यानंतर ब्राव्होनं मैदानातच चिकन डान्स केला.
Watch Dwayne Bravo's Dance Unbelievable! | T10 Leaguehttps://t.co/zeuHENvCLW
— Tarun Singh Verma (@TarunSinghVerm1) December 3, 2018
रविवारी शारजाहमध्ये झालेल्या टी-१० लीगच्या एलिमिनेटर फायनलमध्ये अफगाणिस्तानचा ऑल राऊंडर मोहम्मद नबी आऊट झाला. नबीची विकेट गेल्यानंतर ब्राव्होनं असं सेलिब्रेशन केलं. ब्राव्होनं नबीला त्याच्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. या मॅचमध्ये ब्राव्होनं ४ विकेट घेतल्या आणि २७ रनवर तो नाबाद राहिला. ब्राव्होच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे मराठा अरेबियन्सनं बंगाल टायगर्सना ७ विकेटनं हरवलं.
टी-१० क्रिकेट लीगमध्ये एक बॉलर फक्त २ ओव्हरच टाकू शकतो. ब्राव्होनंही २ ओव्हरमध्येच ही कामगिरी केली. दुसऱ्या एलिमिनेटरमध्ये नॉर्थन वॉरियर्सनी अरेबियन्सना १० विकेटनं हरवलं. पुढच्या मॅचमध्ये बंगाल टायगर्सनी अरेबियन्सना ६ विकेटनं हरवलं. त्या मॅचमध्ये ब्राव्हो २ रन करून आऊट झाला आणि त्याला एक विकेटही मिळाली.
टी-१० लीग फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सनी पखतून्सना २२ रननी हरवलं आणि टी-१० लीग ट्रॉफी आपल्या नावावर केली. टी-१० क्रिकेट लीगचे हे दुसरं वर्ष होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-१० लीग ही एकमात्र स्वीकृत स्पर्धा आहे. २०१७ पासून प्रत्येक वर्षी ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित केली जाते.