चेन्नई : अंबाती रायडू(८२) आणि मॅन ऑफ दी मॅच ठरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी(नाबाद ७०) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई बंगळूरुवर पाच विकेट राखून विजय मिळवला. हा सामना फारच उत्कंठावर्धक ठरला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. कर्णधार धोनीने महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने आपल्या डावात अखेरच्या चेंडूवर षटकार मारत विजय मिळवून दिला. यावेळी वर्ल्डकपच्या अखेरच्या विजयी षटकाराची आठवण आली.
हा षटकार ठोकल्यानंतर ड्वाये ब्रावोला आनंद गगनात मावत नव्हता. त्याने लगेचच धोनीला मिठी मारत आनंद व्यक्त केला. दुसरीकडे हा सामना पाहण्यासाठी धोनीची पत्नी साक्षीही उपस्थित होती. धोनीने शेवटचा षटकार ठोकलात शेन वॉर्नसह इतर सहकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. धोनीची पत्नीही प्रचंड खुश होता. तिच्या डोळ्यात जिंकण्याचा आनंद दिसत होता. धोनीचे चाहतेही खूश झाले होते.
SWEET!#RCBvCSK #VIVOIPL pic.twitter.com/0Wwpbmrjtx
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2018
चेन्नईला विजयासाठी अखेरच्या षटकांत १६ धावांची गरज होती. ड्वाये ब्रावोने अखेरच्या षटकांत एक चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर एक धाव काढताना धोनीकडे स्ट्राईक दिला. धोनी चौथ्या चेंडूवर जोरदार षटकार लगावत विजयश्री खेचून आणली.