अंडर-१९ वर्ल्ड कप : पाकिस्तानला लोळवताना भारताने केले हे विक्रम

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.

Updated: Feb 4, 2020, 11:08 PM IST
अंडर-१९ वर्ल्ड कप : पाकिस्तानला लोळवताना भारताने केले हे विक्रम title=

पॉटचेफस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. यशस्वी जयस्वालचं नाबाद शतक आणि दिव्यांश सक्सेनाच्या नाबाद अर्धशतकामुळे भारताने ही मॅच १० विकेटने जिंकली आणि फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केला. पाकिस्तानने ठेवलेल्या १७३ रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने ३५.२ ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

पाकिस्तानसोबतच्या या विजयासोबतच भारताने काही विक्रमही केले. अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमने सेमी फायनल १० विकेटने जिंकली आहे. याचबरोबर अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनल किंवा फायनलमध्ये मागची पाचही शतकं भारतीय बॅट्समननी केली आहेत.

२००६, सेमी फायनल- चेतेश्वर पुजारा- १२९ नाबाद

२०१२, फायनल- उन्मुक्त चंद- १११ नाबाद

२०१८, सेमी फायनल- शुभमन गिल- १०२ नाबाद

२०१८, फायनल- मनजोत कालरा- १०१ नाबाद

२०२० सेमी फायनल- यशस्वी जयस्वाल- १०५ नाबाद

अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण २४ मॅच झाल्या आहेत, यातल्या १५ मॅचमध्ये भारताचा आणि ८ मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला आहे, तर १ मॅच टाय झाली आहे.

अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० सामने झाले आहेत, यातल्या ५ मॅचमध्ये भारताचा विजय तर ५ मॅचमध्ये पराभव झाला. पण मागच्या ४ वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.

भारत-पाकिस्तान अंडर-१९ वर्ल्ड कप सामन्यांचा इतिहास 

अंडर-१९ वर्ल्ड कप, १९८८- पाकिस्तानचा ६८ रननी विजय

अंडर-१९ वर्ल्ड कप, १९९८- भारताचा ५ विकेटने विजय

अंडर-१९ वर्ल्ड कप, २००२- पाकिस्तानचा २ विकेटने विजय

अंडर-१९ वर्ल्ड कप, २००४- पाकिस्तानचा ५ विकेटने विजय 

अंडर-१९ वर्ल्ड कप, २००६- पाकिस्तानचा ३८ रननी विजय 

अंडर-१९ वर्ल्ड कप, २०१०- पाकिस्तानचा २ विकेटने विजय

अंडर-१९ वर्ल्ड कप, २०१२- भारताचा १ विकेटने विजय 

अंडर-१९ वर्ल्ड कप, २०१४- भारताचा ४० रनने विजय 

अंडर-१९ वर्ल्ड कप, २०१८- भारताचा २०३ रनने विजय 

अंडर-१९ वर्ल्ड कप, २०२०- भारताचा १० विकेटने विजय