मुंबई : ... आणि शनिवारी माऊंट माऊंगानुई मैदानात पुन्हा एकदा भारताचा तिरंगा मोठ्या डौलात फडकला. यंदाच्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारताने आपले निर्विवाद वर्चस्व चौथ्यांदा सिद्ध केले. क्रकेट विश्वातील ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघालात मात देत, तब्बल ८ गडी राखून भारताने विजय संपादन केला. प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघातील प्रमुख पाच बिनीचे शिलेदार या विजयाचे शिल्पकार ठरले. जाणून घेऊ या शिलेदारांबद्धल.
पृथ्वी शॉ, म्हणजे भारताच्या अंडर १९ क्रिकेट संघाचा कर्णधार. हा पठ्ठ्या केवळ कर्णधार म्हणूनच महत्त्वाचा नाही. तर, तो एक जबरदस्त खेळाडूही आहे. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना या पठ्ठ्याने जबरदस्त खेळी केली. पृथ्वीने टूर्नामेंटच्या एकूण ५ डावांमद्ये ९४. ५६ च्या स्ट्राईक रेटने २६१ धावा ठोकल्या. सलामवीह म्हणून मैदानावर येत त्याने संघाला चांगली सुरूवात करू दिली. अंतिम सामन्यात पृथ्वीने अवघ्या २९ धावाच केल्या. पण, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने ठेकलेल्या ९४ धावा संघाला मोठी संधी देऊन गेल्या.
कमलेश नागरकोटी हा एक भारताचा वेगवान गोलंदाज. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांची चांगलीच भंबेरी उडवली. तब्बल १४९ किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकणारा नागरकोटी भारतीय संघाचा अविभाज्य घटक ठरला. ६ सामन्यांमध्ये नागरोकोटीने ९ बळी घेतले. तो केवळ वेगवान गोलंदाजच नाही. तर, योग्य वेळी चेंडूचा वेग हवा तसा कमी-अधीक करणारा, चेंडूवर प्रचंड प्रभुत्व असणारा असा हा जिगरबाज खेळाडूही आहे. पाकिस्तान विरूद्ध झालेल्या सेमीफायनल सामन्यात त्याने एकही बळी घेतला नाही. पण, त्याने एकूण पाच षटकं टाकली. त्यात केवळ सातच धावा दिल्या. या त्याने चक्क एक षटक असे टाकले, त्यात पाकला एकही धाव घेता आली नाही.
शुभम गिल हा भारतातील सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या खेळाडूंपैकी एक. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ३७२ धावा ठोकत सर्वाधीक धावा बनवणारा तो दुसरा खेळाडू ठरला. सलग तिन साम्यानत तो सामनावीरही राहिला. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने पहिल्यांदा भारताच्या वतीने शतक ठोकले. त्याच्यावर उप-कर्णधारपदाचीही जबाबदारी होती.
डेल स्टेनर हा शिवमचा आदर्श. आपल्या खेळीतही त्याच्यावर ही छाप जाणवते. समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम तो चपखल करतो. त्याच्याकडे पाहिले की तो वेगवान गोलंदाज असेल मुळीच वाटत नाही. पण, त्याचा चेंडू प्रतीस्पर्ध्याला गारद करतो, हे नक्की.
भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अनुकूलची भूमिका प्रचंड अनुकूल राहिली आहे. १४ बळी घोत अनुकूलची कामगिरी सर्वात वरचढ राहिली. त्याची खेळीवर कौतूकाचा चौफेर वर्षाव होत आहे.