आशिया कप : भारतीय अंडर-१९ टीमची घोषणा, अर्जुन तेंडुलकरला संधी नाही

बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीनं पुढच्या महिन्यात बांगलादेशमध्ये होणाऱ्या अंडर-१९ आशिया कपसाठी १५ सदस्यांच्या निवड केली आहे. 

Updated: Aug 29, 2018, 05:53 PM IST
आशिया कप : भारतीय अंडर-१९ टीमची घोषणा, अर्जुन तेंडुलकरला संधी नाही  title=

मुंबई : बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीनं पुढच्या महिन्यात बांगलादेशमध्ये होणाऱ्या अंडर-१९ आशिया कपसाठी १५ सदस्यांच्या निवड केली आहे. २९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पवन शाह भारतीय टीमचा कर्णधार आहे तर अनुज रावत आणि प्रब सिमरन सिंग हे दोन विकेट कीपर आहेत. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला या टीममध्ये संधी देण्यात आलेली नाही. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या यूथ टेस्टमध्ये अर्जुनची भारतीय टीममध्ये निवड झाली होती. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अर्जुननं ६५ रन देऊन २ विकेट घेतल्या. या मॅचमध्ये अर्जुन शून्य रनवर आऊट झाला. तर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये अर्जुननं १४ रनची खेळी केली होती. या सीरिजमध्ये अर्जुन ऑल राऊंडर म्हणून खेळला होता.

आशिया कपबरोबरच बीसीसीआयनं चार टीमच्या स्पर्धेच्या टीमचीही घोषणा केली आहे. भारत अंडर १९ ए, भारत अंडर १९ बी, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये १२ ते १८ सप्टेंबरमध्ये लखनऊमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.

आशिया कपसाठी भारतीय अंडर-१९ टीम

पवन शाह (कर्णधार), देवदत्त पडिकल, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, यश राठोड, आयुष बदौनी, नेहाल वधेडा, प्रब सिमरन सिंग, सिद्धार्थ देसाई, हर्ष त्यागी, अजय देव गौड, यातिन मांगवानी, मोहित जांगडा, समीर चौधरी, राजेश मोहंती

अंडर १९ भारतीय ए टीम

पवन शाह (कर्णधार), देवदत्त पडिकल, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, प्रब सिमरन सिंग, यश राठोड, आयुष बदौनी, नेहाल वधेडा, सिद्धार्थ देसाई, हर्ष त्यागी, अजय देव गौड, यातिन मांगवानी, मोहित जांगडा, समीर चौधरी, राजेश मोहंती

अंडर १९ भारतीय बी टीम

वेदांत मुरकर(कर्णधार), ठाकुर तिलक वर्मा, कामरान इकबाल, वामसी कृष्णा, प्रदोष रंजन पॉल, ऋिषभ चौहान, सिद्धांत राणा, सयन कुमार विश्वास, शुभंग हेगडे, रिज्वी समीर, पंकज यादव, आकाश सिंग, अशोक संधू, आयुष सिंग, नितीश रेड्डी, साबीर खान, साहिल राज, राजवर्धन हेंगडेकर