U19 Women's T20 WC : तिथं पोरींनी मैदान गाजवलं; इथं कोच द्रविडनं खास व्यक्तीकडे सोपवली मोठी जबाबदारी

U19 Women's T20 WC : हम किसी से कम नही, असं म्हणत U 19 Women's T20 WC मध्ये भारतातील तरुणींनी जी कमाल केली ती पाहता प्रत्येकानं त्यांचं कौतुक केलं.   

Updated: Jan 30, 2023, 11:04 AM IST
U19 Women's T20 WC : तिथं पोरींनी मैदान गाजवलं; इथं कोच द्रविडनं खास व्यक्तीकडे सोपवली मोठी जबाबदारी  title=
U 19 T20 WC coach dravid and Team India congratulates Womens team after historic

U19 Women's T20 WC 2023: भारतीय क्रिकेट संघातील नव्या जोमाच्या तरुणींनी रविवार खऱ्या अर्थानं गाजवला असं म्हणायला हरकत नाही. कारण, या मुलींनी  Women’s U-19 T20 World Cup च्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा (England) पराभव करत एक नवा इतिहास रचला. (Shefali Verma) शेफाली वर्माच्या नेतृत्त्वाखाली मैदानात आलेल्या या संघातून प्रत्येक खेळाडूनं तिची छाप सोडली आणि क्रीडाजगताला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. ही कामगिरी पाहून टीम इंडियाच्या (Tam India mens team) पुरुष संघाकडूनही या तरुणींवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. जिथं खुद्द कोच राहुल द्रविडसह संघातील इतर खेळाडूही शुभेच्छा देताना दिसले. यामध्ये खास जबाबदारी होती एका खास व्यक्तीच्या हाती. 

BCCI कडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये हा दिवस ऐतिहासिक असल्याचं द्रविड म्हणाला आणि त्यानं अशीच कामगिरी करून दाखवणाऱ्या U-19 World Cup विजेता कर्णधार पृथ्वी शॉ (Prithwi Shaw) याच्याकडे माईक सोपवत U-19 World Cup विजेत्या मुलींच्या संघास शुभेच्छा देण्याची विनंती केली जिथं पुरुष संघाच्या वतीनं पृथ्वीनं ही जबाबदारी अतिशय सुरेखपणे पार पाडली. 

हेसुद्धा वाचा : U-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL

 

मुलींची ही कामगिरी इतकी कौतुकास्पद ठरली, की खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि विराट कोहली यांनीसुद्धा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 

U-19 World Cup विजेत्या मुलींवर कोट्यवधींच्या बक्षीसांची बरसात 

रविवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विजेत्या संघावर 5 कोटी रुपयांच्या रोख रकमेच्या बक्षीसाची बरसातही केली. पहिल्या वहिल्या मुलींच्या U-19 World Cup वर भारतीय संघाचं नाव कोरलं जाणं ही अतिशय महत्त्वाची बाब ठरत आहे. 

यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच महिलांच्या अंडर 19 टी20 क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात झाली आणि पहिलंवहिलं जेतेपद भारतातील महिला संघानं पटकवलं ही अतिशय मोठी बाब आहे. 69 धावांचं आव्हान भारतीय संघानं अवघ्या 14 ओव्हरमध्ये पूर्ण करत जेतेपदावर आपलं नाव कोरलं. सध्या सोशल मीडियापासून वर्तमानपत्रांपर्यंत सर्वत्र या मुलींचीच चर्चा सुरु आहे.