मुंबई: ISSF विश्व कप नेमबाजी स्पर्धा वादात सापडली आहे. याचं कारण म्हणजे वाढत्या कोरोनाचा परिणाम आणि विश्व कपआधीच खेळाडूंना होणारी कोरोनाची लागण. शनिवारी 4 भारतीयांसह 5 नेमबाजांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी सकाळी दोन भारतीय पिस्टल नेमबाज खेळाडूंसह तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. रॅपिड फायर स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या दोन अन्य भारतीय खेळाडूंना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेनं या संदर्भात माहिती दिली आहे.
Two more Indian shooters have tested positive for #COVID19 at the ISSF Shooting World Cup. They have been shifted to the hospital: National Rifle Association of India (NRAI) official
— ANI (@ANI) March 21, 2021
अनेक विदेशी खेळाडूंनी बायो बबल नियमांचं उल्लंघन देखील केलं आहे. राहायला दिलेल्या हॉटेल्समधून परस्पर टॅक्सी बूक करून दिल्ली फिरत असल्याचंही सांगितलं जात आहे. या सगळ्याची दखल घेऊन विदेशी नेमबाजांसाठी पुन्हा नव्यानं कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय नेमबाज खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर विदेशी खेळाडूंची देखील RTPCR चाचणी करण्यात आली. आतापर्यंत या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंमध्ये 4 भारतीय खेळाडूंसह 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असून सध्या या खेळाडूंवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.