कोलंबो : क्रिकेटच्या खेळात चेंडूमुळे मैदानावर अनेक अपघात झालेत. अनेक खेळाडूंना तर आपला जीव गमवावा लागलाय. असाच काहीसा अपघात भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी झाला असता.
भारताची फलंदाजी सुरु असताना असे काही घडले की ज्यामुळे क्षणभरासाठी स्टेडियममधील दर्शक तसेच कमेंटेटर्सचा काळजाचा ठोकाच चुकला. यात अंपायर रोड टकर यांना दुखापत झाली असती. मात्र वेळीच ते सावध झाले आणि बचावले.
हार्दिक पांड्या मैदानावर फलंदाजी करत होता. यावेळी पुष्पकुमाराने टाकलेला चेंडू हार्दिकने सरळ रेषेत टोलावला. चेंडू सरळ अंपायरच्या दिशेने गेला. वेगाने येणारा चेंडू पाहून अंपायरने सावध झाले आणि स्वत:चा बचाव केला. जर हा चेंडू रोड टकर यांना लागला असता तर ते गंभीर जखमी होऊ शकले असते. या घटनेनंतर टकर यांनी पांड्याला हसतखेळत स्थिती किती गंभीर होऊ शकली असती हे सांगितले.
Turns out Rod Tucker is The One after all. Someone give Morpheus a bell and let him know he's got the wrong bloke... pic.twitter.com/NfmataApjB
— The Cricket Paper (@TheCricketPaper) August 4, 2017