Tokyo Paralympics | सुहास यथिराजची ऐतिहासिक कामगिरी; बॅडमिंटनमध्ये पटकावले रौप्य पदक

टोकीओ पॅराऑलंपिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू सुहास एल यथिराज यांनी रौप्य पदक पटकावले आहे.

Updated: Sep 5, 2021, 10:32 AM IST
Tokyo Paralympics | सुहास यथिराजची ऐतिहासिक कामगिरी; बॅडमिंटनमध्ये पटकावले रौप्य पदक title=

नवी दिल्ली : टोकीओ पॅराऑलंपिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू सुहास एल यथिराज यांनी  रौप्य पदक पटकावले आहे. सुहास नोएडाच्या गौतम बुद्ध नगरचे डीएम आहेत. 

बॅडमिंटन पुरूष एकेरी एसएल 4 च्या अंतिम सामन्यात सुहास एल यथिराजने पहिली फेरी 21-15 ने आपल्या नावावर केली.तर दुसऱ्या फेरीत फ्रांन्सच्या लुकास माजुरने 21-17ने बाजी मारली.  नंतर तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीत यथिराज 15-21ने पराभूत झाले. त्यामुळे ते सुवर्णपदक मिळवण्यापासून वंचित राहिले.

सुहास यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीटरवर म्हटले आहे की, 'सेवा आणि खेळाचे अद्भुत संगम असलेल्या यथिराजने आपल्या शानदार खेळामुळे पूर्ण देशाचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केले आहे. बॅडमिंटनमध्ये त्यांनी मिळवलेल्या रौप्य पदकामुळे अभिनंदन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा'

टोकीओ पॅराऑलंपिकमध्येमध्ये यथिराज यांच्या रौप्यपदकामुळे देशात आनंदाचे वातावरण आहे विशेषतः गौतमबुद्ध नगरमधील लोकांकडून यथिराजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2016 मध्ये बिजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पिअनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पिअनशिप जिंकणारे ते पहिले भारतीय नोकरशाह बनले. त्यावेळी ते आजमगडच्या जिल्हाधिकारी पदी कार्यरत होते.