Tokyo Olympics | भारतीय महिला हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये पराभव, पण पदकाच्या आशा कायम

भारतीय महिला हॉकी टीमचा सेमी फायनलमध्ये (Semi-Final)  पराभव झाला आहे. 

Updated: Aug 4, 2021, 05:21 PM IST
Tokyo Olympics | भारतीय महिला हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये पराभव, पण पदकाच्या आशा कायम title=

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) टीम इंडियासाठी (Indians Women's Hockey Team) बॅड न्यूज आली आहे. भारतीय महिला हॉकी टीमचा सेमी फायनलमध्ये (Semi-Final)  पराभव झाला आहे. उपांत्य सामन्यात अर्जेंटीनाने (Argentina Women's Hockey Team) भारताचा पराभव करत अंतिम फेरीत (Hockey Final)  धडक मारली आहे.  अर्जेंटीनाने भारताचा 2-1ने पराभव केला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाच्या सुवर्ण पदकाच्या आशा धूसर झाल्या आहेत. (Tokyo Olympics Indian womens hockey team lose against Argentina in the semifinal match to take on Great Britain in bronze medal clash)

आता ब्राँझ टार्गेट

दरम्यान, आता टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी, भारतीय हॉकी टीमला पदकाच्या आशा कायम आहेत. टीम इंडिया ग्रेट ब्रिटनसोबत ब्राँझसाठी भिडणार आहे. हा सामना 6 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून शेवट गोड करत भारतासाठी  ब्राँझ मेडल मिळवण्याचे प्रयत्ने भारतीय महिला हॉकी संघाचे असणार आहेत.