TOKYO OLYMPIC : हरली पण शेवटपर्यंत भिडली! मेरी कॉमचं आव्हान संपुष्टात

भारताची अव्वल महिला बॉक्सर 38 वर्षीय मेरी कोमने कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीला कडवी टक्कर दिली

Updated: Jul 29, 2021, 05:12 PM IST
TOKYO OLYMPIC : हरली पण शेवटपर्यंत भिडली! मेरी कॉमचं आव्हान संपुष्टात  title=

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमधून भारतासाठी एक निराशाजनक बातमी. पदकाची दावेदार असलेली भारताची आघाडीची महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम टोकिया ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. 51 किलो वजनी गटात मेरी कोमला पराभवा पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय क्रीडा प्रेमींना धक्का बसला आहे. 

16 व्या फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इग्रिट लोरेना वॅलेन्सियाशी झावला. यात मेरी कोम 2-3 अशा फरकाने पराभूत झाली. पहिली फेरी वॅलेन्सियाने 1-4 अशी जिंकली. दुसऱ्या फेरीत मेरी कोमने जोरदार कमबॅक करत ही फेरी 3-2 अशी जिंकली. पण तिसऱ्या फेरीत तिसऱ्या फेरीत वॅलेन्सियाने केवळ पुनरागमन केलं नाही तर सामना ३-२ ने जिंकला.

38  वर्षीय मेरी कोमने कोलंबियाच्या वॅलेन्सियाला कडवी टक्कर दिली, पण या दिग्गज बॉक्सरचा ऑलिम्पिकमधला प्रवास इथेच थांबला आहे.