हे ५ भारतीय खेळाडू भारताला वर्ल्डकप जिंकवून देऊ शकतात

५ खेळाडूंच्या खांद्यावर विजयाची जबाबदारी

Updated: Jan 1, 2019, 12:51 PM IST
हे ५ भारतीय खेळाडू भारताला वर्ल्डकप जिंकवून देऊ शकतात title=

मुंबई : २०१९ हे वर्ष क्रिकेटसाठी खास असणार आहे कारण या वर्षी वर्ल्डकप होत आहे. ३० मे ते १४ जुलै दरम्याने इंग्लंडमध्ये वर्ल्डकप होणार आहे. सगळ्याच टीम वर्ल्जकप जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. यासाठी सगळ्यात टीमने जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकला होता. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या विराट कोहलीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. 

सध्या भारतीय टीममध्ये संतुलन आणि फॉर्म दोन्ही आहे. या वर्ल्डकपमध्ये भारतासमोर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचं मोठं आव्हान असेल. भारतीय टीममधील असे ५ खेळाडू आहेत ज्यांच्या चांगल्या कामगिरीवर भारतीय टीम वर्ल्डकप जिंकू शकते. अनेक भारतीय खेळाडू पहिल्यांदा वर्ल्डकप खेळणार आहेत.

१. कुलदीप यादव

कुलदीप यादव आज अनेकांना परिचीत झाला आहे. आपल्या गोलंदाजीने त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे. कुलदीपने फक्त ३३ वनडे सामन्यांमध्ये ६७ विकेट घेतल्या आहेत. २०१८ मध्ये १९ सामन्यांमध्ये त्याने ४५ विकेट घेतले. यावर्षी वनडेमध्ये सर्वाधित विकेट घेणाऱ्य़ांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे कुलदीप यादव हा या वर्ल्डकपमध्ये मोठा फॅक्टर ठरु शकतो.

२. जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा फ्रंट लाइन गोंलबाज बनलेला भारतीय टीममधला आणखी एक महत्त्वाचा गोलंदाज बुमराहवर देखील अनेकांच्या नजरा असतील. २०१८ मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेट चाहत्य़ांना देखील त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

३. ऋषभ पंत

वर्ल्डकपमध्ये धोनी विकेटकीपर असणार आहे. पण ऋषभ पंतचं नाव देखील जर आलं तर आश्चर्य वाटायला नको. त्याने देखील आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याची आक्रमक बॅटींग कधीही सामना फिरवू शकतो. त्यामुळे अशा खेळाडूची देखील भारतीय टीमला गरज असणार आहे.

४. हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या हा टीम इंडियाचा उगवता तारा म्हणून समोर आला आहे. आयपीएलमध्ये त्याने त्याची कामगिरी दाखवून दिली. हार्दिकला आशिया कपमध्ये दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं होतं. पण तो पुन्हा भारतीय टीममध्ये कमबॅक करु शकतो. एक चांगला ऑलराउंडर म्हणून टीमला त्याची नक्कीच गरज आहे. गरज पडली तर तो बॉलिंग ही करु शकतो. त्यामुळे भारतीय संघात त्याची जागा निश्चित मानली जात आहे. 

५. अंबाती रायडू

चेन्नई सुपरकिंग्सला आयपीएलचा किताब जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रायडूला देखील भारतीय संघात स्थान मिळू शकतं. त्याने भारतासाठी आतापर्यंत ४५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५१.६८ च्या रनरेटने १४४७ रन केले आहेत. मध्यम स्थानी खेळण्यासाठी तो टीम इंडियामध्ये फिट बसतो. त्यामुळे त्याची निवड देखील निश्चित होऊ शकते.