India vs Australia, 3rd Test, Day 3 Highlights : तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. (IND vs AUS 3rd Test) या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. (Test Cricket News) दरम्यान, चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2 -1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. या विजयामुळे चौथ्या कसोटीत चुसर निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कांगारुंसाठीही ही कसोटी मालिका 2 -2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर टीम इंडिया चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. Cricket News in Marathi)
इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 76 धावांचे टार्गेट ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने केवळ एक गडी गमावून सहज गाठले. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया अपयशी ठरली आहे. रोहित टीमचे सर्व 'प्लानिंग' फोल ठरले चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने दिवसाच्या दुसऱ्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला 0 धावांवर बाद करुन भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र 12 व्या षटकात चेंडू बदलण्यात आला. चेंडू बदलल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पलटला. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लबुशेन यांनी आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड (49 धावा) आणि मार्नस लबुशेन (28 धावा) नाबाद राहिले.
चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकानंतरही टीम इंडिया दुसऱ्या डावात नॅथन लियॉनच्या (8/64) फिरकी जादूसमोर 163 धावांत आटोपली आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ 76 धावांचे लक्ष्य ठेवले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा झुंज दिली आणि पुजारा (142 चेंडूत 59, पाच चौकार, एक षटकार) शिवाय एकही फलंदाज लियॉनसमोर टिकू शकला नाही. लिओनने सामन्यात 99 धावांत 11 विकेट घेतल्या.
टीम इंडियाला खराब शॉट मोठा फटका बसला तर ऑस्ट्रेलियाने चांगले क्षेत्ररक्षण केले. बुधवारी पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 109 धावांवर गुंडाळली गेली. त्यानंतर वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी गुरुवारी सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 197 धावांत गुंडाळले होते. तर यजमान ऑस्ट्रेलियाने 88 धावांची आघाडी घेतली होती.
दुसऱ्या डावातही भारताची सुरुवात चांगली झाली नाही. खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या लोकेश राहुल याच्या जागी संघात सहभागी करण्यात आलेला शुभमन गिल (5) पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि लिओनचा चेंडू पुढे खेळण्याच्या प्रयत्नात बोल्ड झाला. त्यानंतर लियोनने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (12) एलबीडब्ल्यू केले ज्याची लांबी पूर्णपणे चुकली. विराट कोहली (13) डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमनच्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पुढचा चेंडू खूप मागे खेळण्याच्या प्रयत्नात एलबीडब्ल्यू झाला.
रवींद्र जडेजा (7) देखील चहाच्या विश्रांतीपूर्वी लिऑनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. मैदानावरील पंचांनी त्याला आऊट दिले नाही, पण ऑस्ट्रेलियाने डीआरएसचा अवलंब केल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. चहापानानंतर दुसऱ्या दिवशी अय्यरने आक्रमक वृत्ती दाखवली. त्याने कुहनेमनला लागोपाठ षटकार ठोकले तर लियॉननेही सलग दोन चौकार मारले.