Video 5 Bangladesh Players Run Behind Ball: सध्या बांगलादेशमधील चितगावमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यामधील काही क्षण सोशल मीडियावर चर्चेचा आणि मिम्सचा विषय ठरत आहेत. बांगलादेशच्या संघाने चेंडू श्रीलंकन फलंदाजाच्या थेट बॅटला लागत असतानाही एलबीडब्यूसाठी घेतलेल्या डीआरएसचा निर्णयावरुन मोठ्याप्रमाणात ट्रोलिंग झालं. त्यानंतर बांगलादेशच्या 3 खेळाडूंनी प्रयत्न करुनही त्यांना एक कॅच घेता आला नाही. त्यांचा हा मजेदार प्रयत्नही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. असं असतानाच खरोखरच बांगलादेशचा संघ अंतरराष्ट्रीय स्तरावरील संघ आहे का असा प्रश्न निर्माण करण्यासारखा व्हिडीओ या सामन्यातून समोर आला आहे.
सध्या चर्चेत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक, दोन नाही तर तब्बल 5 खेळाडू एक बॉल थांबवण्यासाठी त्याचा पाठलाग करताना दिसत आहे. बॉण्ड्रीकडे जात असलेल्या या बॉलच्या मागे तब्बल 5 खेळाडू धावत असगी बॉण्ड्रीपर्यंत जाताना व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून क्रिकेट चाहते संभ्रमात पडले आहेत. गोलंदाज आणि विकेटकीपर वगळला तर उर्वरित खेळाडूंच्या संख्येपैकी अर्ध्याहून अधिक खेळाडू हा एक चेंडू रोखण्यासाठी पळत असल्याचं पाहून चाहत्यांना या खेळाडूंना नेमकं काय होतंय? असा प्रश्न पडला आहे.
Movie inspiring a real-life incident
.
.#BANvSL #FanCode pic.twitter.com/1USI5EH9cV— FanCode (@FanCode) April 1, 2024
अनेकांना बांगलादेशी खेळाडूंचा हा व्हिडीओ पाहून बॉलिवूडमधील 'लगान' चित्रपट आठवला आहे. या चित्रपटामध्ये क्रिकेट कसं खेळावं हे शिकताना एका प्रसंगात अशाप्रकारे सर्व खेळाडू एका बॉलच्या मागे धावत जाताना दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात.
1) काय सुरु आहे?
— Fantasy Queen (@a_fantasy_queen) April 1, 2024
2) लगानची टीम
Bangladesh ki team
Lagaan ki team— Deepak Kr Sonkar दीपक (@iamdeepusonkar) April 1, 2024
3) लगानच आठवला
Lagaan ki yaad aa gyi https://t.co/pfvAE3upUR
— Secular Chad (@SachabhartiyaRW) April 1, 2024
4) मेंदूच नाही
Cricket - 0
Skills - 0
Brain - 0— krishna. (@impvkrishna) April 1, 2024
5) हा सीन आठवला
Reminds me of this epic scene#BANvSL#BANvsSL pic.twitter.com/MZP2KNy8Oz
— Nilesh G (@oye_nilesh) April 1, 2024
चितगावच्या मैदानामध्ये सुरु असलेल्या कसोटीमध्ये अशिथा फर्नांडोने 34 धावांमध्ये 4 बांगलादेशी फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवल्याने यजमान संघ 178 धावांवर बाद झाला. यानंतर श्रीलंकेने 353 धावांची मोठी आघाडी मिळवली आहे. मात्र श्रीलंकेने फॉलो ऑन देण्याऐवजी दुसऱ्या डावात फलंदाजीचा निर्णय घेतला. तरी दुसऱ्या डावात त्यांना नावाला साजेशी फंलदाजी जमली नाही आणि तिसरा दिवस संपताना त्यांची अवस्था 102 वर 6 गडी बाद अशी होती. श्रीलंकेने 455 धावांची आघाडी मिळवली आहे. बांगलादेशकडून हसन मेहमूदने 51 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर खलीद मेहमूदनेही श्रीलंकेच्या 2 फलंदाजांना 29 धावांच्या मोबदल्यात तंबूत पाठवलं.