Roger Federer : टेनिस जगताला मोठा धक्का,रॉजर फेडररने अचानक जाहीर केली निवृत्ती

रॉजर फेडररने ट्विट करून आपल्या निवृत्तीबद्दल चाहत्यांना सांगितले आहे

Updated: Sep 15, 2022, 07:47 PM IST
Roger Federer : टेनिस जगताला मोठा धक्का,रॉजर फेडररने अचानक जाहीर केली निवृत्ती title=

महान टेनिसपटूंपैकी (tennis) एक असलेल्या रॉजर फेडररने (Roger Federer) निवृत्तीची घोषणा केली आहे. रॉजर फेडररने ग्रँडस्लॅम (Grand Slam) आणि एटीपी टूरमध्ये खेळण्याच्या संदर्भात निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. रॉजर फेडररने ट्विट करून आपल्या निवृत्तीबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. 

"लंडनमधला पुढचा आठवडा लॅव्हर कप हा माझा शेवटचा एटीपी स्पर्धा असेल. मी भविष्यात आणखी टेनिस खेळणार आहे, निश्चितच, पण ग्रँड स्लॅम किंवा दौर्‍यावर नाही, असे रॉजर फेडररने म्हटलं आहे. 

41 वर्षीय रॉजर फेडररने 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत  अंतिम सामन्यात पराभूत झाल्यापासून तो कोर्टाबाहेर आहे. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. फेडरर सप्टेंबरमध्ये लंडनमधील लेव्हर कपमध्ये परतणार आहे.

"मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1,500 हून अधिक सामने खेळले आहेत. माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपवण्याची वेळ आली आहे," असं फेडररने सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

फेडररच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आठ विम्बल्डन चॅम्पियनशिप, सहा ऑस्ट्रेलियन ओपन, पाच यूएस ओपन आणि एक रोलँड-गॅरोस जिंकले आहेत. त्याने दौऱ्यात 103 विजेतेपदे जिंकली आहेत. स्वित्झर्लंडसाठी ऑलिम्पिक दुहेरीत सुवर्णपदक मिळवून, फेडररने एकदा 237 आठवडे जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा खेळाडू म्हणून विक्रम केला होता.