U-19 वर्ल्डकप फायनलमध्ये मनजोतचं शानदार शतक

भारताचा फलंदाज मनजोत कालराने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जबरदस्त शतक ठोकलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 3, 2018, 01:23 PM IST
U-19 वर्ल्डकप फायनलमध्ये मनजोतचं शानदार शतक title=

माउंट मौंगानुई : भारताचा फलंदाज मनजोत कालराने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जबरदस्त शतक ठोकलं आहे.

मनजोत कालराने 101 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. या इनिंगमध्ये त्याने 8 फोर, 3 सिक्स लगावले. मनजोतच्या घराबाहेर आनंदाचं वातावरण आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्टेलियाने भारतापुढे 217 रनचं टार्गेट दिलं आहे. भारताला दूसरा झटका 131 रन्सवर लागला. शुभमान गिल 31 वर आऊट झाला. परम उप्पलने त्याला बोल्ड केलं.

याआधी 71 रनच्या स्कोरवर भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ 29 रनवर आऊट झाला. त्यानंतर भारताच्या मनजोत कालराने जबरदस्त खेळी करत भारताला विजयाच्या दिशेने पुढे नेण्यात जबरदस्त कामगिरी केली.