Asia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय

Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.

Updated: Sep 17, 2023, 08:14 PM IST
Asia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय title=
asia cup final ind vs sl

India win Asia cup 2023 : पावसामुळे 40 मिनिटं उशिरा सुरू झालेला सामना इतक्या लवकर संपेल कुणी विचारही केला नव्हता. मात्र, टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) कहर केला अन् भारतीय संघाने श्रीलंकेला विरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने आशिया कपच्या फायनल सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे आता  भारतीय संघ आशियाचा नवा बादशाह झाला आहे. डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या 51 धावांचं आव्हान पार करताना टीम इंडियाने एकही गडी न गमावला सामना खिशात घातला. शुभमन गिल आणि इशान किशनच्या जोडीने काम फत्ते केलं. मात्र, विजयाचा खरा शिल्पकार ठरला मोहम्मद सिराज...

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याने श्रीलंकेविरुद्ध कहर केल्याचं दिसून आलं. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कॅप्टन दासुन शनाकाचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सपशेल फेल ठरवला. बुमराहने सामन्याच्या पहिल्याच बॉलवर कहर केला. सलामीवीर कुसल परेरा तंबुत धाडत बुमराहने नारळ फोडला. त्यानंतर सिराजने कहर केला. चौथ्या ओव्हरमध्ये सिराजने एक दोन नव्हे तर चार प्रमुख फलंदाज तंबुत धाडले. सलामीवीर पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका आणि धनंजय डी सिल्वा या चार खेळाडूंना घरचा रस्ता दाखवल्यानंतर टीम इंडियाचं काम सोप्पं झालं.

रोहित शर्माने श्रीलंकेची वाईट अवस्था पाहून फिल्डिंग आणखी टाईट केली. एका बाजूने सिराजचा कहर सुरू होता. तर दुसऱ्या बाजूने रोहितने हार्दिकला बॉल सोपवला. हार्दिकने देखील कॅप्टनच्या विश्वासाला साथ देत 3 धावा देत 3 गडी टिपले. श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.

आणखी वाचा - Mohammed Siraj : सिराजचा लंकेवर 'सर्जिकल स्टाईक', एकाच ओव्हरमध्ये श्रीलंकेची कंबर मोडली; पाहा Video

आशिया कप फायनल- श्रीलंका प्लेइंग 11: पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.

आशिया कप फायनल- टीम इंडिया प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.