टीम इंडियाला मिळणार Split Captain? BCCI मोठ्या फेरबदलाच्या तयारीत!

टीम इंडियाला आता स्प्लिट कॅप्टन (Split Captain) म्हणजेच तिन्ही फॉर्मेटमध्ये विविध कर्णधार मिळू शकतो.

Updated: Nov 19, 2022, 05:27 PM IST
टीम इंडियाला मिळणार Split Captain? BCCI मोठ्या फेरबदलाच्या तयारीत! title=

Split Captaincy in Team India: भारतीय क्रिकेट टीममध्ये (Team India) लवकरच मोठे बदल पहायला मिळणार आहेत. काल म्हणजेच शुक्रवारी संपूर्ण निवड (National Selectors) समिती बरखास्त करण्यात आली. तर आता बीसीसीआयने (BCCI) यासाठी नवे अर्जही मागवलेत. याशिवाय बीसीसीआय आता कर्णधारपदासंदर्भात देखील मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कर्णधारांमध्ये (Captain) बदल होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येतेय. यामध्ये टीम इंडियाला आता स्प्लिट कॅप्टन (Split Captain) म्हणजेच तिन्ही फॉर्मेटमध्ये विविध कर्णधार मिळू शकतो. 

बीसीसीआय आता प्रत्येक फॉर्मेटसाठी वेगळा कर्णधार ठेवण्याच्या विचारात आहे. सध्या केवळ टी-20 मध्ये हा बदल पहायला मिळू शकतो. याठिकाणी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता आहे. याशिवाय रोहित वनडे आणि टेस्ट टीमचे नेतृत्व करणार आहे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने पाहता या फॉर्मेटमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाहीये. मात्र हार्दिक पंड्याला टी-20 टीमचं कर्णधारपद देऊन वेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगळ्या कर्णधाराची संकल्पनाही भारतीय क्रिकेटमध्ये रुजणारे.

हार्दिकला वर्ल्डकपपर्यंत जबाबदारी मिळेल का?

बीसीसीआय (BCCI) आता कर्णधारपद विभाजित करण्याचा विचार करत असून तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार बनवले जाऊ शकतात. एकदिवसीय आणि कसोटीचे कर्णधारपद रोहितने सांभाळलंय. तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya T20 Captain) यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या 2024 टी-20 वर्ल्डकपपर्यंत भारतीय टीमचा सर्वात लहान फॉरमॅटचा कर्णधार असेल.

 हार्दिक सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असून यामध्ये कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केल्यास या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.