'मला माफ करा पण बॅन करू नका', रेफरीसमोर कोहली हातापाया पडला

विराट कोहलीची मैदानावरील तापट वृत्ती महागात पडली. स्लेज करणाऱ्यांना विराटनं जे उत्तर दिलं त्यानंतर तो वाईट पद्धतीनं चर्चेत आला आणि त्याच्यावर कारवाई करण्याएवढी वेळी आली होती. नेमकं काय झालं होतं वाचा सविस्तर

Updated: Aug 1, 2021, 10:38 PM IST
'मला माफ करा पण बॅन करू नका', रेफरीसमोर कोहली हातापाया पडला title=

मुंबई: विराट कोहलीचा आक्रमकपणा आपण सर्वांनी मैदानात पाहिला आहे. कधी बॅटनं राग काढत तर कधी डगमध्ये तोडफोड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. अनेकदा त्याच्या या तापट आणि आक्रमक वृत्तीमुळे मैदानात वादचा सामनाही त्याला करावा लागला. मात्र या स्वभावामुळे तो अडचणीतही आला होता. एकदा विराट कोहली मैदानात त्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यानं चर्चेचा विषय बनला. 

क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीच्या चुकीच्या हावभावामुळे मॅच रेफरीने त्याला बोलावलं त्यावेळी त्यावेळी त्याला काढण्याची भीती होती. त्यामुळे वेळीच चूक सुधारण्यासाठी कोहलीनं रेफरीची माफी मागितली आणि त्याच्यावर बंदी घालू नये अशी विनंती केली.

हा संपूर्ण प्रकार 2012 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा दरम्यान घडला होता. जेव्हा विराट कोहलीने सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्या दरम्यान प्रेक्षकांना अक्षेपार्ह हावभाव करत पोह दाखवलं होतं. कोहली बाउन्ड्री लाइनवर फिल्डींग करत होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे चाहते त्याला डिवचण्यासाठी उलट-सुलट बोलत होते. त्याला भडकवण्याचा प्रयत्न करत होते. 

प्रेक्षकांमधील काही जणांनी शिवीगाळ करायला सुरुवात केल्यावर मात्र विराट चांगलाच संतापला. विराट स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने प्रेक्षकांना मधलं बोट दाखवलं. त्यानंतर त्यानंतर कोहलीचं वर्तन चर्चेत आलं. कोहलीने 2018 मध्ये या घटनेचा उल्लेख केला होता. 

कोहली म्हणाला होता की, सिडनीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर तो मॅच रेफरीकडे गेला होता आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंदी घालू नये अशी विनंती त्याने मॅच रेफरीला केली होती. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार विरोट कोहलीला दुसऱ्या दिवशीचा पेपरमधील फोटो पाहून मॅच रेफरीनं आपल्या खोलीत बोलवून घेतलं आणि जाब विचारला. त्यावेळी विराटने रेफरीची माफी मागत बंदी न घालण्याची विनंती केली होती. खूप विनंती केल्यानंतर मॅच रेफरीने सोडल्याचंही विराटने सांगितलं होतं.