आपल्या बॅटींगने गोलंदाजांना रडवणारा विराट जेव्हा ढसाढसा रडतो...

 टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएलच्या 15व्या सीझनमध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही.

Updated: Jun 9, 2022, 06:31 PM IST
आपल्या बॅटींगने गोलंदाजांना रडवणारा विराट जेव्हा ढसाढसा रडतो...  title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएलच्या 15व्या सीझनमध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही. तीन वेळा तर विराट गोल्डन डकचा शिकार ठरला होता. यानंतर आता विराट कोहलीचा एक किस्सा समोर आला आहे. यामध्ये कोहली ढसाढसा रडल्याची माहिती आहे. त्यामुळे गुजरातच्या खेळाडूने सांगितलेल्या किस्स्याची एकच चर्चा रंगली आहे.  

नेमका किस्सा काय ? 
विराट कोहलीचा लहानपणीचा मित्र आणि गुजरात टायटन्सचा गोलंदाज प्रदीप संगवान याने विराटबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितलाय. दिल्लीच्या अंडर 17 संघात कोहली आणि संगवान होते. त्यावेळी संघाच्या एका प्रशिक्षकाने विराट कोहलीची मजा उडवण्यासाठी विनोदी योजना आखली होती.   

प्रदीप संगवानने एका वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले की, 'आम्ही पंजाबमध्ये अंडर-17 सामन्यात खेळत होतो. गेल्या २-३ डावात कोहली मोठी धावसंख्या करत नव्हता. आमच्या संघात अजित चौधरी नावाचे एक प्रशिक्षक होते, ते विराटला 'चीकू' म्हणायचे. विराट आमच्या संघाचा प्रमुख खेळाडू होता. एके दिवशी अजित सरांनी विराटची टींगल उडवण्याचे ठरवले. त्यावेळी पुढच्या सामन्यात तो खेळणार नाही हे त्याला कळवा, असे आदेश दिले. आम्ही सर्वजण या विनोदी घटनेत सामील होतो.  

संगवान पुढे म्हणतो, 'सरांनी टीम मीटिंगमध्ये विराटच्या नावाची घोषणा केली नाही. मग विराट त्याच्या खोलीत गेला आणि रडू लागला! त्याने सरांना फोन करून सांगितले की मी 200 आणि 250 धावा केल्या आहेत. खरे सांगायचे तर त्या मोसमात त्याने मोठी धावसंख्या केली होती. गेल्या दोन-तीन डावांत त्याने पुरेशा धावा केल्या नव्हते. तो इतका भावूक झाला की त्याने आपले (विराट) बालपणीचे प्रशिक्षक
राजकुमार सरांना फोनही केला.

विराटने या प्रकारानंतर संगवानला गाठले आणि त्याला त्याच्या उणिवांबद्दल विचारले. याविषयी संगवान म्हणाले, 'मग तो माझ्याकडे आला आणि त्याने काय चूक केली? हे विचारू लागला. या मोसमात मी इतक्या धावा केल्या आहेत. मी त्यांना सांगितले की हे खूप चुकीचे आहे. यानंतर संगवान याने हा एक विनोद असल्याचे त्याला सांगितले. प्रशिक्षक तुझी मस्ती करत असल्याचे त्याने सांगितले. 

आयपीएल कामगिरी 
विराट कोहलीने आरसीबीसाठी 16 सामन्यांमध्ये सुमारे 23 च्या सरासरीने फक्त 341 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे कोहलीही तीन वेळा गोल्डन डकचा बळी ठरला होता. कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून कोहली संघात परतणार आहे.