ICC Test Ranking New in Marathi : भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरूद्ध पाच टेस्ट मालिका 4-1 च्या फरकाने आपल्या नावावर केली आहे. हैद्राबादमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला मात दिली होती, मात्र यानंतर भारताने विशाखापट्टम, राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे इंग्रजांना धाराशाही केले होते. या मालिकेमुळे टीम इंडियाला मोठा फायदा झालेला आहे. आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये टिम इंडिया आणि रोहित शर्माने न्यूझीलंडला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत किंग ठरले आहे.
इंग्लंडविरूद्धची मालिका जिंकल्यामुळे टीम इंडिया आता आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये 74 पॉईंट्ससोबत नंबर 1 टीम बनलेली आहे. भारतीय क्रिकेट टीम ही आधीच वनडे आणि टी 20 मध्येपण टॉपवर आहे. भारताकडे वनडेमध्ये एकूण 121 तर टी 20 मध्ये 266 पॉईंट्स आहेत. आयसीसी टेस्ट रॅकिंगच्या दुसऱ्या स्थानावर असलेली न्यूझीलंड टीम सध्या ऑस्ट्रलियाविरूद्ध 2 टेस्ट मॅचेसची सिरीज खेळत आहे. न्यूझीलंडच्या खात्यात एकूण 36 पॉईंट्स असून त्यांचा पॉईंट्स पर्संटेज ऑस्ट्रलियापेक्षा जास्त असल्याने न्यूझीलंड ही दूसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजचा काहीही निकाल आला तरी त्याचा परिणाम टीम इंडियाच्या रॅंकिंगवर होणार नाही आणि यामुळे भारताकडे नंबर वन स्पॉट कायम असेल.
धर्मशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पाचव्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने 64 धावा आणि एक इनिंग्स राखून मिळवलेल्या विजयामुळे टीम इंडिया WTC च्या पॉईंट्स टेबलमध्ये 68.51 (PCT) नंबर 1 वर आहे. भारताने WTC च्या या हंगामात उत्तम प्रदर्शन करत 9 मधून 6 टेस्ट मॅचेस जिंकलेल्या आहेत. न्यूझीलंड ही 60.00 च्या पॉईंट्स पर्संटेजने दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रलिया 59.09 च्या पॉईंट्स पर्संटेजने तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताने जानेवारीच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 2 टेस्ट मॅचेसची सिरीज खेळली होती. या सिरीज चा निकाल 1-1 असा होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एक टेस्ट मॅच हरल्यामूळे टीम इंडिया WTC च्या रॅंकिंगमध्ये खाली घसरली होती. पण इंग्लंडविरूद्ध उत्कृष्ट प्रदर्शन करत भारताने नंबर 1 चे स्थान परत मिळवलेले आहे.