Dhoni visits Dewri Maa Temple : टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनींचं (MS Dhoni) नाव घेतलं जातं. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. नव्या गाडीची सवारी करताना धोनीचा व्हिडिओ (MS Dhoni Video) अनेकांनी पाहिला असेल. अशातच आता धोनीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Dhoni Temple Visit Dhoni reached Maa Deori temple in Ranchi to visit Mata latest news)
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (Mahendra Singh Dhoni) झारखंडमधील प्रसिद्ध अशा माँ देवरी मंदिरात (Deori Maa Temple) दर्शनासाठी पोहोचला होता. माही माँ देवरीच्या पूजेत सहभागी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. लहानपणीच्या काही सवंगड्यांसह धोनी मंदिरात पोहोचला होता. त्याचा हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये धोनी निळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये दिसतोय.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) त्याचबरोबर विराट कोहलीने (Virat Kohli) देखील मंदिरांना भेट दिली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिला सामना रांचीच्या मैदानावर खेळला गेला होता. त्यावेळी धोनीने (MS Dhoni) आवर्जून मैदानात जाऊन खेळाडूंची भेट घेतली होती. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विट केला होता. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता जवळपास 3 वर्षे होऊन गेली. तरी देखील त्याची फॅन फॉलोविंग कमी झाली नाही.