भारतापुढे न्यूझीलंडमध्ये पहिली टी-२० जिंकण्याचं आव्हान

भारत आणि न्यूझीलंडमधल्या टी-२० मॅचच्या सीरिजची पहिली मॅच बुधवारी वेलिंग्टनच्या सेडन पार्क मैदानात खेळवण्यात येईल.

Updated: Feb 5, 2019, 05:34 PM IST
भारतापुढे न्यूझीलंडमध्ये पहिली टी-२० जिंकण्याचं आव्हान title=

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंडमधल्या टी-२० मॅचच्या सीरिजची पहिली मॅच बुधवारी वेलिंग्टनच्या सेडन पार्क मैदानात खेळवण्यात येईल. परदेशी जमिनीवर मागच्या ३ महिन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतापुढे आता न्यूझीलंडला टी-२० मध्ये पराभूत करण्याचं आव्हान असेल. याआधी झालेल्या वनडे सीरिजमध्ये भारतानं न्यूझीलंडला ४-१नं मात दिली होती. याआधी भारताला न्यूझीलंडमध्ये एकही टी-२० मॅच जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे हे रेकॉर्ड बदलण्याची संधी आहे.

विराटची अनुपस्थिती

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला आराम देण्यात आल्यामुळे रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच टी-२० सीरिजच्या टीममध्येही काही बदल करण्यात आले आहेत. वनडे टीममध्ये नसलेला ऋषभ पंतला टी-२० टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. तर महेंद्रसिंग धोनीचंही टी-२० टीममध्ये पुनरागमन झालं आहे. धोनीनं शेवटची टी-२० मॅच मागच्यावर्षी जुलै महिन्यात खेळली होती. तर युवा खेळाडू शुभमन गिललाही टीममध्ये विराटच्याऐवजी संधी देण्यात आली आहे. शेवटच्या २ वनडेमध्ये मिळालेल्या संधीचा गिलला फायदा उठवता आला नव्हता.

भारतानं याआधी २००८-०९ साली आणि २०१२ साली न्यूझीलंडमध्ये टी-२० सीरिज खेळली. यामध्ये भारताला २-० आणि १-०नं पराभव पत्करावा लागला. म्हणजेच अजूनपर्यंत भारताला न्यूझीलंडमध्ये टी-२० मॅच जिंकता आलेली नाही.

कुठे पाहता येणार मॅच?

बुधवार ६ फेब्रुवारीला पहिली टी-२० खेळवली जाईल

वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियममध्ये ही मॅच होईल

भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी ७.३० वाजता सुरु होईल

मॅचचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्सवर बघता येईल

मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर दिसेल

भारतीय टीम

रोहित शर्मा(कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलली अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या, मोहम्मद सीराज

न्यूझीलंडची टीम

केन विलियमसन(कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, लॉकी फरग्यूसन, स्कॉट के, कॉलीन मुन्रो, डॅरिल मिचेल, मिचेल सॅण्टनर, टीम सेयफर्ट, ईश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स नीशम