टीम इंडियाचा कॅप्टन विराट टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा अव्वल

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली पुन्हा एकदा अव्वल ठरलाय. 

Updated: Dec 4, 2019, 02:35 PM IST
टीम इंडियाचा कॅप्टन विराट टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा अव्वल title=

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली पुन्हा एकदा अव्वल ठरलाय. आयसीसीच्या टेस्ट रँकिंमध्ये विराट कोहलीनं पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकलंय. ९२८ पॉईंटसह विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे तर ९२३ पॉईंटसह ऑस्ट्रेलियाचा स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८७७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. 

तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. आयसीसी क्रमवारीत भारताच्या तीन बँटसमननी पहिल्या स्थान पटकावण्यात यश मिळालंय. ऑल राऊंडर्सच्या रँकिंगमध्ये रवींद्र जाडेजा दुसऱ्या आणि आर अश्विन पाचव्या क्रमांकावर आहेत.