मोठ्या स्पर्धेत विराट-शास्त्री जोडी अपयशी, दोघांवर टांगती तलवार

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. 

Updated: Jul 4, 2021, 10:49 PM IST
मोठ्या स्पर्धेत विराट-शास्त्री जोडी अपयशी, दोघांवर टांगती तलवार title=

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (World Test Championship Final) टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर टीम इंडिया, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. पराभवानंतर या दोघांच्या जागी दुसऱ्यांना संधी द्यायला हवी,  अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे या विराट आणि रवी शास्त्री यांच्या दोघांसाठी इंग्लंड दौरा (Team Indian England Tour 2021) महत्वपूर्ण असणार आहे. टीम इंडिया आता इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (team india captain virat kohli and head coach ravi shastri always fails in big event)   

शास्त्री-कोहली जोडी फ्लॉप 

रवी शास्त्री आणि विराट कोहली ही जोडी आतापर्यंत अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये अपयशी ठरली आहे.  रवी शास्त्रींनी मुख्य प्रशिक्षकाची सूत्र हातात घेतल्यापासून टीम इंडियाला आतापर्यंत मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. या दरम्यान टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकली आहे.

रोहितला कर्णधार करण्याची मागणी 

दरम्यान टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) नेतृत्वाची जबाबदारी द्यायला हवी, अशी मागणी गेल्या वर्षभरापासून करण्यात येत आहे. रोहितच्या कॅपटन्सीमध्ये टीम इंडियाची विजयी आकडेवारी चांगली राहिली आहे. तसेच रोहितने आपल्या नेतृत्वात आयपीएलमध्ये मुंबईला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. यामुळे रोहितचं नाव आघाडीवर आहे.  

शास्त्रींच्या जागी द्रविडला संधी?

भारतीय क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला. पराभवापासून मुख्य प्रशिक्षकपदावरुन रवी शास्रींना हटवण्यात यावे, तर त्या जागी राहुल द्रविडची निवड करण्यात यावी, अशी मागणी नेटीझन्सकडून करण्यात येत आहे. तसेच याबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. दरम्यान विराट-रवी शास्त्रींना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागणार की परिस्थिती जैसे थे च राहणार, हे येत्या काळात समजेल.   

संबंधित बातम्या : 

Love की Arrange Marriage? चाहत्याच्या गुगलीवर स्मृतीचा मास्टरस्ट्रोक, म्हणाली....

है तयार हम! श्रीलंकेत भारतीय युवा संघाचा सराव सुरु, BCCIने शेअर केला व्हिडिओ