Team India च्या जर्सीबाबत मोठा निर्णय, आता कोणते बदल होणार?

Team India Jersey :  2019 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी प्रायोजकत्वात Byju ने Oppo ची जागा घेतली. त्याच वेळी MPL ने किट प्रायोजकत्व वर्ष 2020 मध्ये Nike ची जागा घेतली. यानंतर भारतीय संघाच्या जर्सीमध्ये आता काय होणार बदल? जाणून घ्या सविस्तर माहिती.. 

Updated: Dec 22, 2022, 02:02 PM IST
Team India च्या जर्सीबाबत मोठा निर्णय, आता कोणते बदल होणार?  title=

BCCI Jersey and Kit sponsorship: भारतीय संघात आधीच बदलाचे वारे सुरु असतानाच आणखी एका बदलासह भारत संघ मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेशविरूद्ध टेस्ट सामना खेळत आहेत. असं असताना भारतीय क्रिकेट संघाची (Team India) जर्सीबाबात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे दोन मोठे प्रायोजक 'BYJU'S' आणि 'MPL Sports' यांना BCCI सोबतचा प्रायोजकत्व करार संपवायचा आहे. जूनमध्ये Byju ने BCCI  सोबत  $35 दशलक्ष जर्सी प्रायोजकत्वाचा नोव्हेंबर 2023 पर्यंत करार केला होता. परिणामी यापुढे टीम इंडियाच्या जर्सीवर या भारतीय कंपनीचे नाव दिसणार नाही.  

टीम इंडियाच्या जर्सीवरून ही नावे हटणार

'बीसीसीआयला 4 नोव्हेंबर 2022 रोजी बायजसकडून एक ईमेल आला, ज्यामध्ये नुकत्याच संपलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर  करार संपवण्याची विनंती केली होती. BYJU'S सोबतच्या आमच्या चर्चेनुसार आम्ही त्यांना विद्यमान व्यवस्था चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि किमान 31 मार्च 2023 पर्यंत ही भागीदारी सुरू ठेवण्यास सांगितले आहे.

वाचा: आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरणार 'हा' संघ, RCB आणि KKR...?

हे धक्कादायक कारण समोर आले

बुधवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेत या विषयावर चर्चा झाली. Byju ने 2019 मध्ये 'Oppo' ची जागा घेतली. कतारमध्ये 2022 च्या फिफा विश्वचषकाच्या प्रायोजकांमध्ये बायजूचा समावेश होता. टीम किट आणि 'व्यापारी' प्रायोजक एमपीएलने बीसीसीआयला सांगितले की ते, फक्त किरण क्लोदिंग लिमिटेड (केकेसीएल) ला त्याचे हक्क देऊ इच्छित आहेत. त्याचा सध्याचा करार 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध आहे. MPL ने नोव्हेंबर 2020 मध्ये 'Nike' ची जागा घेतली.

ईमेलद्वारे स्पष्टीकरण

बीसीसीआयला 2 डिसेंबर 2022 रोजी एमपीएल स्पोर्ट्सकडून एक ईमेल प्राप्त झाला होता. ज्यामध्ये त्यांनी 1 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा करार (संघ आणि माल) 'फक्त किरण क्लोदिंग लिमिटेड'ला दिला होता. ईमेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही MPL स्पोर्ट्सला 31 मार्च 2023 पर्यंत असोसिएशन सुरू ठेवण्यास सांगितले आहे किंवा केवळ उजव्या छातीवर 'लोगो' असलेला आंशिक करार करण्यास सांगितले आहे. परंतु किट बनवण्याचा करार नाही." सुरुवातीला वर्षातील, पेटीएमने भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामासाठी 'मास्टरकार्ड' ला 'टायटल' प्रायोजकत्व करार दिला होता. निवड समितीच्या स्थापनेनंतरच केंद्रीय करारावर निर्णय घेतला जाईल. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर बीसीसीआयने चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील पॅनलची हकालपट्टी केली होती.