BCCI: इंग्लंडविरूद्धच्या टी-20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; अखेर 'या' खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली संधी

Indian Women's Cricket Team: बीसीसीआयने नुकतंच इंग्लंडच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी टीम इंडियाला इंग्लंडसोबत टी-20 आणि टेस्ट सिरीज खेळायच्या आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 2, 2023, 10:30 AM IST
BCCI: इंग्लंडविरूद्धच्या टी-20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; अखेर 'या' खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली संधी title=

Indian Women's Cricket Team: बीसीसीआयने नुकतंच इंग्लंडच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. डिसेंबर महिन्यात महिलांच्या टीम इंडियाला इंग्लंडसोबत टी-20 आणि टेस्ट सिरीज खेळायच्या आहेत. यावेळी महिलांच्या या टीममध्ये एका खेळाडूला पहिल्यांदाच टी-20 टीममध्ये संधी देण्यात आली आहे.  

भारताच्या वुमेंस टीममध्ये 28 वर्षीय महिला गोलंदाजाला टी-20 फॉर्मेटमध्ये संधी मिळाली आहे. टीम इंडिया 6 ते 17 डिसेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची सिरीज खेळणार आहे. यानंतर 14 ते 24 डिसेंबर दरम्यान दोन टेस्ट सामने खेळवले जातील. यामध्ये प्रथम इंग्लंडविरुद्ध आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सामन्यांचा समावेश आहे.

या खेळाडूला मिळाली संधी

वुमेंस प्रीमियर लीग (WPL) मध्ये या गोलंदाजांना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. डावखुरी स्पिनर गोलंदाज सायका इशाक हिची टीम इंडियासाठी प्रथमच T20 टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजसाठी तिचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

इंग्लंडविरूद्धच्या टी-20 सामन्यांसाठी कशी आहे टीम इंडिया

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), जेमिमा रोड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयाका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंह ठाकुर, तितास साधु, पूजा वस्त्राकर, कनिका आहूजा, मिन्नू मणि.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात कशी आहे टीम इंडिया

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), जेमिमा रोड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देयोल , सायका इशाक, रेणुका सिंह ठाकुर, तितास साधु, मेघना सिंह, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर.