Akshar-Meha Wedding : भारतीय क्रिकेटपटू के एल राहूल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीचा विवाह सोहळा (KL Rahul-Athiya Shetty Wedding) 23 जानेवारीला मोठ्या शाही थाटात पार पडला. अभिनेता आणि अथिया शेट्टीचे वडिल सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या बंगल्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राहुल आणि अथियाच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता टीम इंडियातला आणखी एक क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकणार आहे.
अक्षर पटेलचा विवाह सोहळा
टीम इंडियाच अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा (Axar Patel) गुरुवारी 26 जानेवारीला गुजरातमधल्या (Gujrat) वडोदऱ्यात विवाह सोहळा पार पडणार आहे. अक्षर पटेलचा विवाह नदियाड इथल्या मेहा पटेलशी (Meha Patel) होणार आहे. अक्षर आणि मेहा एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. आज या दोघांच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. गुजराती परंपरेने अक्षर-मेहाचं लग्न होणार आहे. एका वर्षापूर्वी अक्षर-मेहाचा साखरपूडा झाला होता.
न्यूझीलंड वन डेतून घेतली सुट्टी
लग्नामुळे अक्षर पटेलने (Axar Patel Marriage) न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून सुट्टी घेतली आहे. अक्षर पटेलऐवजी टीम इंडियात वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. लग्न समारंभ उरकल्यानंतर अक्षर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे. (India vs Australia Test Seires) बीसीसाआयनेही (BCCI) अक्षरची सुट्टीही मंजूर केली आहे.
अक्षर आणि मेहा अनेक काळापासून एकमेकांना डेट करतात. 20 जानेवारी 2022 मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला.. अक्षर आणि मेहा सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. आपले अनेक फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अक्षर आणि मेहाचा लग्नसोहळा चार दिवस चालणार आहे. अक्षर आणि मेहाच्या लग्नात केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार असून गुजरातमधल्या एका हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.
मेहा आहे आहारतज्ज्ञ
मेहा पटेल ही व्यवसायाने डायटीशियन (Dietician) आणि न्यूट्रिशियनिस्ट (Nutritionist) आहे. तसंच तिला ट्रॅव्हलिंगची (Traveller) आवड आहे. सोशल मीडियावर (Social Media) आपल्या ट्रॅव्हिलिंगचे अनेक फोटो ती शेअर करते. मेहाने आपल्या हातावर अक्षरच्या नावाचा टॅटू कोरला आहे. मेहाच्या 28 व्या वाढदिवशी अक्षर पटेलने तिला प्रपोज केलं होतं. यानंतर दोघांचा साखरपुडाही पार पडला. साखरपुड्याचे फोटो अक्षरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.