क्वालालंपूर : आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय महिला टीमचा बांगलादेशनं पराभव केला. ६ वेळा आशिया कप जिंकणाऱ्या भारताला यावेळी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक झाली. बांगलादेशसारख्या कमोजर टीमनं भारताचा एकाच आठवड्यात दोनवेळा पराभव केला. बांगलादेशला मॅचच्या शेवटच्या बॉलला विजयासाठी २ रनची आवश्यकता होती. जहानआरा आलमनं भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॉलिंगवर डीप मिडविकेटवर शॉट मारून २ रन केल्या आणि बांगलादेशपुढे असलेलं ११३ रनचं आव्हान पार केलं.
बांगलादेशच्या टीमचा जेव्हा विजय होत होता तेव्हा बांगलादेशचे पुरुष खेळाडू भारतामध्ये सेलिब्रेशन करत होते. बांगलादेशच्या पुरुष टीमचा बॅट्समन तमीम इक्बालनं त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये हरमनप्रीतनं ४२ बॉलमध्ये ५६ रन केल्या. एवढच नाही तर तिनं १९ बॉलमध्ये २ विकेटही घेतल्या. लेग स्पिनर पूनम यादवनं ९ रन देऊन ४ विकेट घेतल्या. फलंदाजांनी निराशा केल्यामुळे पराभव झाल्याचं हरमनप्रीतनं मान्य केलं.