मुंबई : तालिबान या दहशतवादी संघटनेने आता अफगाणिस्तान पूर्णपणे काबीज केलं आहे. दहशतवादाचे हे भयानक परिणाम आता हळूहळू या देशाच्या क्रिकेट उपक्रमांवरही होताना दिसत आहे. जगातील अनेक देशांनी आता अफगाणिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार देत आहे. असंच पाऊल आता क्रिकेटमधील एका मोठ्या देशाने उचललं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधार टीम पेनने म्हटलं आहे की, आम्हाला अर्ध्या लोकसंख्येसोबत भेदभाव करणाऱ्या संघाविरुद्ध खेळणं आवडणार नाही. यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना होणार आहे. अफगाणिस्तानच्या नवनिर्वाचित तालिबान सरकारने महिला क्रिकेट खेळण्यास विरोध जाहीर केल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या पुरुष संघांमधील कसोटी रद्द केली जाईल असं मानलं जातंय.
सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली की जर महिलांच्या खेळाबद्दल तालिबानचं मत खरी असतील तर 27 नोव्हेंबरपासून होबार्ट येथे होणाऱ्या कसोटी पुढे जाऊ शकणार नाही. निवेदनात म्हटलंय की, "क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी जागतिक स्तरावर महिला क्रिकेटच्या वाढीला गती देणं हे अत्यंत महत्वाचं आहे." क्रिकेटसाठी आमचं ध्येय हे आहे की, तो सर्वांसाठी खेळ आहे आणि आम्ही सर्व स्तरांवर महिलांसाठी खेळाचं समर्थन करतो.
पेन म्हणाला, आम्हाला आयसीसीकडून काहीही कळलेलं नाही. टी -20 वर्ल्ड कपसाठी एका महिन्यात आहे. मला वाटते की अफगाणिस्तानला यात सहभागी होणे अशक्य आहे.