T20 WC NAM Vs SL: नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करताच सोशल मीडियावर 'हास्यजत्रा', नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव

आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यातच अक्रित घडलं असं म्हणावं लागेल. आशिया कप विजेत्या श्रीलंकन संघाला नामिबियानं (Sri Lanka Vs Namibia) पराभूत केलं. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.

Updated: Oct 16, 2022, 01:48 PM IST
T20 WC NAM Vs SL: नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करताच सोशल मीडियावर 'हास्यजत्रा', नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव title=

T20 WC NAM Vs SL Match Mems Viral: आयसीसी टी 20 वर्ल्डकप (ICC T20 WC) स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यातच अक्रित घडलं असं म्हणावं लागेल. आशिया कप विजेत्या श्रीलंकन संघाला नामिबियानं (Sri Lanka Vs Namibia) पराभूत केलं. श्रीलंकन संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. नामिबियानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमवून 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाचा डाव कोसळला. श्रीलंकेनं 19 षटकात सर्व गडी बाद फक्त 108 धावा केल्या. 55 धावांनी श्रीलंकेला पराभव सहन करावा लागल्याने क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

श्रीलंकेच्या पराभवानंतर सुपर 12 फेरीतील वाट बिकट झाली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. श्रीलंकेची पहिल्या सामन्यातील खेळी पाहून मजेशीर मीम्स शेअर (Memes On Social Media) करण्यात आले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. 

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंना स्थान

नामिबिया संघ- मायकल वॅन लिंगेन, डिवान ला कॉक, निकोल लॉफ्ती इटॉन, स्टीफन बार्ड, गेरहार्ड इरास्मुस (कर्णधार), जॅन फ्रायलिंक, डेविड विस, जेजे स्मित, झेन ग्रीन, बर्नार्ड स्कॉल्ट्झ, बेन शिकोंगो

श्रीलंकन संघ- पथुम निस्सांका, कुसल मेंडिस, धनंजय डिसिल्वा, दानुश्का गुनाथिलाका, भानुका राजपक्षा, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, दुशमंथा चमिरा, महीश थीकशाना