T20 World Cup 2022: 'आता टीम इंडियाला बघून घेऊ' शोएब अख्तरने दिली धमकी

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचं  (Shoaib Akhtar) बेताल वक्तव्य, सेमीफायनल आधी भारताबद्दल ओकली गरळ

Updated: Nov 7, 2022, 07:20 PM IST
T20 World Cup 2022: 'आता टीम इंडियाला बघून घेऊ' शोएब अख्तरने दिली धमकी title=

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेला टी20 वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. सेमीफायनलचं (Semifinal) चित्रही स्पष्ट झालं आहे. सेमीफायनलमध्ये भारत विरुध्द इंग्लंड (India vs England) तर न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानचा (New Zealand vs Pakistan) सामना रंगणार आहे. यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) टीम इंडियाला (Team India) थेट धमकी दिली आहे. त्याने सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. नेदरलँडने (NetherLand) बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा झाला. यानंतर शोएब अख्तरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याने दक्षिण आफ्रिकेचे धन्यवाद मानले आहेत. 

टीम इंडियाला दिलं आव्हान
व्हिडिओत शोएब अख्तरने टीम इंडियाला थेट धमकीही दिली आहे. आता आम्ही भारताला बघून घेऊ असं शोएब अख्तरने या व्हिडिओत म्हटलं आहे. शोएबने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, धन्यवाद दक्षिण आफ्रिका! तुम्ही सर्वात मोठे चोकर्स आहात, पाकिस्तानला संधी दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, पण आता आम्हाला भारतीय संघाला पुन्हा एकदा दाखवून द्यावं लागणार आहे, असं शोएबने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

पुन्हा भारताविरुद्ध विष ओकलं
काही दिवसांपूर्वीच शोएब अख्तरने भारत पुढच्या आठवड्यात मायदेशी परतले असं वक्तव्य केलं होतं. टीम इंडिया म्हणजे 'तीस मार खाँ नाहीए' जी फायनलमध्ये पोहोचेल अशी भविष्यवाणी शोएबने केली होती. आता पुन्हा धमकी देत शोएबने म्हटलंय 'तुम्ही बोलत होतात पाकिस्तान बाहेर पडेल, पण आता आपल्याला पुन्हा भेटायचं आहे'

भारत आणि पाकिस्तान फायनल
टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ पाहिला आपल्याला आवडेल असं शोएबने म्हटलंय. तसंच त्याने इतर संघांवरही टीका केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये जवळपा सर्वच संघांचा खेळ खालच्या दर्जाचा होता. ऑस्ट्रेलियाला आपल्याच मायदेशात बाहेर पडावं लागलं, इंग्लंडनेही साजेशी कामगिरी केलेली नाही, इतकंच काय तर पाकिस्तानलाही चांगली कामगिरी करता आलेली नाही.