Pak Vs Nz : सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडची बॅटींग फेल; पाकिस्तानला फायनल गाठण्यासाठी 153 रन्सचं आव्हान

न्यूझीलंडने (New Zealand) पहिली फलंदाजी करत पाकिस्तानला (pakistan) 153 रन्सचं आव्हान दिलंय. 

Updated: Nov 9, 2022, 03:35 PM IST
Pak Vs Nz : सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडची बॅटींग फेल; पाकिस्तानला फायनल गाठण्यासाठी 153 रन्सचं आव्हान title=

T20 World Cup Semi-Final: टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिली सेमीफायनल (semifinal) खेळवली जात आहे. यामध्ये न्यूझीलंडने (New Zealand) पहिली फलंदाजी करत पाकिस्तानला (pakistan) 153 रन्सचं आव्हान दिलंय. आजचा सामना जी टीम जिंकणार त्यांच्यासाठी फायनलचा (final) मार्ग खुला होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही.

सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मोठ्या मुश्किलीने टीमला 100 रन्सचा स्कोर गाठता आला. एका बाजूने विकेट्स जात असताना कर्णधार केन विलियम्सन मात्र किल्ला लढवत होता. केनने 42 बॉल्समध्ये 46 रन्सची खेळी केली. न्यूझीलंडकडून डेरल मिशेल याने सर्वाधिक रन्स करत अर्धशतक झळकावलं. 35 बॉल्समध्ये त्याने 53 रन्सची शानदार खेळी केली.