India vs South Africa T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट टीम विजयाची हॅट्टिक करण्यासाठी सज्ज आहे. आज रविवारी 30 ऑक्टोबरला भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकासोबत (South Africa) होणार आहे. पर्थच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. टीम इंडियाने या पूर्वी पहिला विजय पाकिस्तावर मिळवला. त्यानंतर नेदरलँड्सवर (Netherlands) सलग दुसरा विजय मिळवून भारतीय टीमने वर्ल्ड कपमध्ये आपलं वचर्स्व गाजवलं आहे. आजचा सामना जिंकल्यास टीम इंडियाचं सेमीफायनल पक्क असणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार 4 वाजता पाहता येणार आहे. टीम इंडियाचे काही स्टार्स खेळाडू भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करण्यात मोठे योगदान देणार आहेत. (T20 World Cup 2022 Match 30 October IND vs SA Todays Match live Update nmp)
टीम इंडियाचा मास्टर स्ट्रोक...जगातील सर्वोत्तम बँटिंगमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तो विराट कोहली. टीम इंडियासाठी अनेक सामने त्याने स्वबळावर जिंकले आहेत. गेल्या काही काळात तो भारतासाठी सर्वात विश्वासार्ह बँटिंग करणारा तिसरा क्रमांकावरील खेळाडू राहिला आहे. याशिवाय T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने भारतासाठी 111 टी-20 सामन्यांमध्ये 3856 धावा केल्या आहेत.
आशिया कपपासून विराट कोहली चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची खेळी खेळली होती. यानंतर त्याने नेदरलँडविरुद्धही 62 धावा केल्या. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावा काढण्यासाठी त्याची बॅट सज्ज आहे. आजच्या मॅचमध्ये विराटची खेळीकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
इंडियाचा उत्कृष्ट बॉलर अर्शदीप सिंग...T20 वर्ल्ड कपमध्ये त्याची आतापर्यंतची खेळी ही जबरदस्त राहिली आहे. अर्शदीप सिंग दोन मॅचमध्ये जी कामगिरी दाखवली आहे त्यानंतर जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती अजिबात जाणवत नाही आहे. पाकविरोधात झालेल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाबर आझमला बाहेरचा रस्ता दाखवला. या मॅचमध्ये अर्शदीप याने 3 विकेट घेऊन भारताला विजय मिळवून देण्यात हातभार लावला. तर नेदरलँड्सविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या. अर्शदीपने टीम इंडियासाठी 15 टी-20 सामन्यात 25 विकेट घेतल्या आहेत.
भारतीय संघातील तिसरं नाव आहे सूर्यकुमार यादव. 2022 मधील T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याला भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हणतात. तो मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटकेबाजी करू शकतो. त्याने नेदरलँड्सविरुद्ध 51 धावांची तुफानी खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर खूप विश्वास ठेवतो. त्याने भारतासाठी 36 टी-20 सामन्यांमध्ये 1111 धावा केल्या आहेत, ज्यात एका झंझावाती शतकाचा समावेश आहे. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये या तीन स्टार्स खेळाडूंकडून टीमला आणि भारतीयांना खूप अपेक्षा आहेत.