मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेतील (T 20 World Cup 2022) सुपर 12 राउंडला शनिवार 22 ऑक्टोबरपासून सुरुवात झालीय. मात्र संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याकडे लागून राहिलं आहे. या हायव्होल्टेज सामन्याला 24 तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे. दोन्ही संघांनी नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. मात्र या सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूला दुखापतीमुळे या महामुकाबल्याला मुकावं लागणार आहे. ( t20 world cup 2022 ind vs pak pakistan batsman fakhar jama ruled out against india match confirmed by babar azam)
पाकिस्तानचा टॉप ऑर्डरचा बॅट्समन फखर जमां (Fakhar Jama) दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. फखर आता दुखापतीतून सावरण्यासाठी मेहनत घेणार आहे.
"फखर या सामन्यासाठी पूर्णपणे फीट नाही. फखरला यामुळे पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही", अशी माहिती बाबरने दिली. "फखरला गेल्या महिन्यात दुबईत टी-20 आशिया कप फायनलमध्ये फिल्डिंग करताना उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतरही तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नाहीये", असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सांगितलं होतं. दरम्यान आता जमाच्या जागी डावखुरा फलंदाज शान मसूदचा संघात समावेश केला जाऊ शकतो.