Dhanashree Verma : ऑस्ट्रेलियामधील युजी धनश्रीसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

T20 World Cup 2022 : युजी आणि धनश्री हे सोशल मीडियावर स्टार आहेत. या कपलचे इंस्टाग्राम रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. आता ऑस्ट्रेलियामधील या दोघेंचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

Updated: Oct 27, 2022, 01:10 PM IST
Dhanashree Verma : ऑस्ट्रेलियामधील युजी धनश्रीसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल  title=
T20 World Cup 2022 Dhanashree verma Instagram pic yuzvendra chahal nmp

Dhanashree verma Instagram : T20 World Cup 2022 मध्ये आज भारत (India) आणि नेदरलँड (Netherlands) यांच्यामध्ये सामना सुरु आहे. सध्या T20 World Cup 2022 साठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये आहे. अशातच युजी धनश्रीसोबतचे रोमँटिक फोटो (Romantic photos) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानही युजी आपल्या बायकोला एकटं सोडताना दिसतं नाही आहे. युजी आणि धनश्री हे सोशल मीडियावर स्टार आहेत. या कपलचे इंस्टाग्राम (Instagram) रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. आता ऑस्ट्रेलियामधील (Australia) या दोघेंचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

Yuzvendra Chahal Latest Photos: भारतीय स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा ऑस्ट्रेलियामध्ये गेली आहे. यावेळी पाकिस्तानशी दोन हात केल्यावर टीम इंडिया सिडनीमध्ये (Sydney) पोहोचली. तेव्हा युजी आपल्या बायको धनश्रीसोबत सिडनीमध्ये फिरताना दिसला. या क्षणाचे फोटो धनश्रीने आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये धनश्री वर्मा (Dhanashree Verma) खूप सुंदर दिसतं आहे.  (T20 World Cup 2022 Dhanashree verma Instagram pic yuzvendra chahal nmp)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

सोशल मीडिया क्वीन 

धनश्री ही सोशल मीडिया क्वीन म्हणून ओळखली जाते. ती इंन्स्टाग्राम अनेक फोटो आणि रील्स, व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा जोरदार चाहता वर्ग आहे. सध्या तिचे ऑस्ट्रेलियामधील सिंगल फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोला तिने कॅप्शन दिलं आहे की, लोकांनी सांगितलं होतं की, 'ओपरा हाऊन नक्की जाशील. थँक्यू भाऊ सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). माझा फोटो काढण्यासाठी..' धनश्री ही डान्स कोरियोग्राफर आणि डेंटिस्ट आहे. 

देविशाने खेचली धनश्रीची टांग!

धनश्रीने जेव्हा सूर्यकुमार यादवला फोटो काढण्यासाठी थँक्यू म्हटलं त्यानंतर सूर्यकुमारची बायको देविशाने (Devisha) धनश्रीची टांग खेचली. या फोटोला रिप्लाय देताना सूर्यकुमार यादवने धन्यवाद मंडळ, असं लिहिलं आहे. तर देविशा म्हणते की, 'आमच्याकडे एक प्रतिभावान छायाचित्रकार आहे.'