T20 WC: सामन्यात मोठा अपघात थोडक्यात टळला... नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

एक बॉल 2 वेळा अंपायरच्या डोक्यात जबरदस्त लागता लागता वाचला... पाहा सामन्यातील थरारक व्हिडीओ

Updated: Oct 27, 2021, 04:38 PM IST
T20 WC: सामन्यात मोठा अपघात थोडक्यात टळला... नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ title=

दुबई: टी 20 वर्ल्ड कपचे सामने UAE मध्ये सुरू आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. त्यानंतर वेस्टइंडीज विरुद्ध साउथ आफ्रिका झालेल्या सामन्यात दोन वेळा एकच दुर्घटना होत होता टळली आहे. अंपायरच्या डोक्याला दोन वेळा बॉल लागता लागता वाचला आहे. पाकिस्तानचा अंपायर या सामन्यात होता.

एडन  मार्करामच्या 26  बॉलवर नाबाद 51 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने एनरिक नॉर्टजेच्या नेतृत्वाखालील त्यांच्या गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे T20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 टप्प्यातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजचा आठ गडी राखून पराभव केला.

या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली.  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात पाकिस्तानचे अंपायर अलीम दार यांनी एकाच चेंडूवर एकदा नव्हे तर 2-2 वेळा दुखापत होणे टाळले.

वेस्ट इंडिजच्या अंतिम ओव्हरमध्ये किरोन पोलार्डने साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजाने टाकलेल्या बॉलवर जबरदस्त शॉट खेळला. बॉल अंपायरच्या डोक्याला लागणार होता. मात्र अंपायर आपला जीव वाचवण्यासाठी पटकन खाली बसला.

अलीम दार असं या अंपायरचं नाव आहे. आपला जीव वाचवण्यासाठी अंपायर खाली बसला. त्याच वेळी ज्या खेळाडूनं बॉल पकडला त्याने थ्रो करताना पुन्हा अंपायरच्या दिशेनं थ्रो केला.

तो बॉलही लागू नये म्हणून अंपायर पुन्हा खाली वाकला. अशा प्रकारे अंपायर मैदानात मॅचवेळी 2 वेळा मोठ्या दुर्घटनेतून वाचला. तर खेळाडू आणि अंपायरला या घटनेनंतर एक क्षण हसू देखील आलं. फिल्डिंग करणारे खेळाडू देखील या व्हिडीओ हसताना दिसत आहे.