मुंबई : टी -20 वर्ल्ड कप -2021ची आजपासूव सुरूवात झाली आहे. परंतु सगळ्यांना ज्याची आतुरतेने वाट आहे ते म्हणजे 24 ऑक्टोबरची, कारण या दिवशी भारत विरोधी पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. भारत-पाकिस्तान रायवलरी आजही सुरू आहे. जेव्हा हे दोन्ही संघ क्रिकेट खेळण्यासाठी एकमेकांसमोर येतात, तो दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानच्या जर्सीचा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे खेळाडू टी -20 वर्ल्ड कप -2021 मध्ये भारत लिहिलेली जर्सी घालून खेळताना दिसतील. अशी या फोटोमुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत पेजने टी -20 वर्ल्ड कप जर्सीमध्ये बाबर आझमचा फोटो शेअर केले आहे. जर्सीच्या उजव्या बाजूला छातीवर ICC MEN's T20 World Cup India 2021 असे लिहिलेले आहे. याआधी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. ज्यामुळे लोकांना असे वाटू लागले की, पाकिस्तान आता भारत म्हणून खेळाणार का? किंवा पाकिस्तानी बोर्डकडून काही चूक झाली आहे का? परंतु तसे नाही.
वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना त्यांच्या जर्सीच्या उजव्या बाजूला यजमान देशाचे नाव लिहावे लागते. म्हणजेच ते ज्या देशात क्रिकेट खेळायला जाणार आहेत, त्या देशाचे नाव त्यांना जर्सीवरती लिहावे लागेल.
त्यामुळे त्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बाबर आझमच्या जर्सीच्या उजव्या बाजूल ICC MEN's T20 World Cup UAE 2021 लिहिलेले होते, ज्याला एडिट करुन इंडिया लिहिण्यात आलं. मात्र, आता पीसीबीने अधिकृत जर्सीचा फोटो ट्वीटरवरती शेअर केल्यामुळे आता सगळं स्पष्ट झालं आहे
Team Pakistan is up for the fight!
Get behind @babarazam258 and the boys to show your support for Pakistan at the @T20WorldCup.
Get your official shirt now!
Order now at https://t.co/A91XbZsSbJ#WearYourPassion x #WhyNotMeriJaan pic.twitter.com/KAGlD11RzQ— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2021
भारतातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती आणि ओमान संयुक्तपणे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करत आहेत. सलामीच्या सामन्यात यजमान ओमान पापुआ न्यू गिनी (पीएनजी) सोबत सामना खेळत आहे. तर बांगलादेशचा सामना स्कॉटलंडशी होणार आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबरनंतर ग्रुप 2 च्या सामन्यांची सुरुवात होईल.