हिटमॅनचा सुपरहिट कारनामा, टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज

 रोहित शर्मा (Rohit Sharma) अशी कामगिरी करणारा एकूण तिसरा तर टीम इंडियाचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

Updated: Nov 9, 2021, 08:42 PM IST
हिटमॅनचा सुपरहिट कारनामा, टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज title=

यूएई : टीम इंडियाने (Team India) विजयासह टी 20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021 ) शेवट गोड केला. भारतीय संघाने नामिबियावर 9 विकेट्सने विजय मिळवला. नामिबियाने टीम इंडियाला विजयासाठी 133 धावांच आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाकडून केएल राहुल आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) विजयाचा पाया रचला. केएलने नाबाद 54 धावांची खेळी केली. तर रोहितने सर्वाधिक 56 रन्स केल्या. यासह रोहितने कारनामा केला आहे. रोहित टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसराच फलंदाज ठरला आहे. (T 20 world cup 2021 India vs Namibia 42nd Match hitman rohit sharma become 3rd batsman who complete 3 thousnads runs)

रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. रोहित टी 20 क्रिकेटमध्ये 3 हजार धावा करणारा एकूण तिसरा आणि टीम इंडियाचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

रोहितआधी विराट कोहली आणि न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टीलने ही कामगिरी केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार 3 हजार 227 धावांसह विराट अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मार्टिन गुप्टीलने 3 हजार 115 धावा चोपल्या आहेत. तर रोहितच्या नावे 3 हजार 387 धावा आहेत. विशेष बाब म्हणजे रोहितच्या आधी मार्टिनने याच टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत हा 3 हजार धावांचा टप्पा पार केला. 

उल्लेखनीय बाब म्हणजे रोहितने भारतात, परदेशात आणि त्र्यस्थ ठिकाणी समसमान धावा केल्या आहेत. रोहितने भारतात 1 हजार 19, परदेशात 1 हजार 1 तर त्रयस्थ ठिकाणी 1 हजार 18 धावा केल्या आहेत.