Systematic Investment Plan Online सुरु करा आणि मिळवा विशेष फायदा

सध्या गुंतवणुकीसाठी  म्युच्युअल फंड हा सर्वोत्त पर्यायापैकी एक आहे. हल्ली म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा मोठा वापर होतांना दिसतो. 

Updated: Mar 27, 2021, 09:02 PM IST
Systematic Investment Plan Online सुरु करा आणि मिळवा विशेष फायदा title=

मुंबई : सध्या गुंतवणुकीसाठी  म्युच्युअल फंड हा सर्वोत्त पर्यायापैकी एक आहे. हल्ली म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा मोठा वापर होतांना दिसतो.  Systematic Investment Plan च्या मदतीने म्युच्युअल फंडामध्ये निश्चित रक्कम वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये जमा करण सहज शक्य आहे.

थेट स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित नसलेल्यांसाठी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट उत्तम योजना आहे. आता ऑनलाइन  Systematic Investment Plan सुरु करणं सहज शक्य आहे. बाजारात आता अशा अनेक एसआयपी योजना आहेतं ज्यामध्ये गुंतवणूकदार 500 रुपयांमधून आपली गुंतवणूक सुरू करू शकतात.

Online Systematic Investment Plan आवश्यक कागदपत्र :-

1.पॅनकार्ड
2. अॅड्रेस प्रूफ
3. पासपोर्ट फोटोग्राफ
4. चेकबूक

कसा सुरु करणार Online Systematic Investment Plan?

१. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी KYC असणं अनिवार्य आहे.
२. Online Systematic Investment सुरू करण्यासाठी फंड हाऊसच्या वेबसाइटवर तुमचं वैयक्तिक खातं असणं आवश्यक आहे. खाते नसल्यास तुम्हाला नवीन खातं सुरु करणं गरजेचं आहे.
३. नवीन खात्यासाठी तुम्हाला आता नोंदणी करा हा पर्याय निवडा.
४.त्यानंतर एक फॉर्म सबमिट करणं अनिवार्य असेल.
५. या फॉर्ममध्ये तुम्हांला तुमची सर्व वैयक्तिक माहिती आणि संपर्क माहिती भरावी लागेल.
६.ऑनलाइन व्यवहारासाठी आपल्याला एक वापरकर्ता नाव आणि संकेतशब्द तयार करणे आवश्यक आहे.
७. याशिवाय एसआयपी पेमेंटच्या डेबिटसाठी तुम्हाला बँक खात्याचा तपशीलदेखील द्यावा लागेल.
८. त्यानंतर तुम्ही तुमच्या युजरच्या नावाने लॉग इन केल्यानंतर तुमच्या आवडीची योजना निवडू शकता.
९. नोंदणी पूर्ण केल्यानंतर आणि फंड हाऊसकडून त्याची पुष्टी झाल्यावर एसआयपी सुरू केली जाऊ शकते.
१०.एसपीआय सहसा 15 ते 40 दिवसांच्या अंतरानंतर सुरू होतो.  

ज्यांना बाजारातील जोखीम कमी करायची आहे, त्या गुंतवणूकदारांसाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे.  याद्वारे  बाजारात अल्प प्रमाणात  हप्त्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो. तसेच या योजने अंतर्गत, फंड हाऊस एसआय देऊन बँक खात्यातून ऑटो डेबिटची सुविधा देखील घेऊ शकतो, जो दरमहा आपल्या बँक खात्यातून हप्त्याची रक्कम आपोआप वजा करेल.