IND vs SL :टीम इंडियाने श्रीलंकेला दिले इतक्या धावांचे आव्हान

 IND vs SL 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव राजकोटच्या मैदानावर तळपला आहे. सुर्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे.

Updated: Jan 7, 2023, 08:54 PM IST
IND vs SL :टीम इंडियाने श्रीलंकेला दिले इतक्या धावांचे आव्हान  title=

 IND vs SL 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव (surykumar yadav)  राजकोटच्या मैदानावर तळपला आहे. सुर्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात शतकी खेळी केली आहे. या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 5 विकेट गमावून 228 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेसमोर 229 धावांचे आव्हान असणार आहे. आता  श्रीलंका हे आव्हान पुर्ण करते की टीम इंडिया (team india vs sri lanka) त्यांना रोखण्यात यशस्वी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय़ टीम इंडियाच्या खेळाडूंनी यशस्वी करून दाखवला. टीम इंडियाकडून सलामीला ईशान किशन आणि शुभमन गिल उतरला होता. दोघांना सूरूवात चांगली करता आली नाही. कारण ईशान किशन केवळ 1 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर राहूल त्रिपाठी मैदानात उतरला होता. त्रिपाठीने 16 बॉलमध्ये झटपट 35 धावा ठोकल्या आणि तो बाद झाला. 

मैदानावर सूर्याचे वादळ

त्रिपाठी आऊट झाल्यांतर सूर्यकुमार यादव (surykumar yadav)मैदानात उतरला होता.सूर्याने उतरताच तुफान फटकेबाजी करायला सुरूवात केली होती. त्याने 51 बॉलमध्ये 112 नाबाद धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. सूर्याच्या य़ा खेळीने टीम इंडियाचा हा स्कोर 200 पार गेला होता. 

शेवटी कर्णधार हार्दिक पंड्या आणि दीपक हूडा स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अक्षरनेही तुफान फटकेबाजी केली. त्याने 9 चेंडूत 4 फोर मारून 21 धावा ठोकल्या आहेत. या बळावर टीम इंडियाने 5 विकेट गमावून 228 धावा ठोकल्या आहेत. टीम इंडियाकडून सूर्याने (surykumar yadav)नाबाद 112 सर्वाधिक धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मधूशंकाने 2 , कसून राजीथा आणि वानींदू हसरंगाने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. 

दरम्यान आता टीम इंडियाने श्रीलंकेला (team india vs sri lanka) 229 धावांचे लक्ष्य दिले आहे. आता हे लक्ष्य श्रीलंका पुर्ण करून मालिका खिशात घालते की टीम इंडिया त्यांना रोखून मालिका जिंकते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.