सुरेश रैनाने केलाय असा रेकॉर्ड, धोनी आणि कोहलीही नाही करु शकले

आयपीएलमध्ये ३४ अर्धशतक लगावणारा बॅट्समन तो ठरलाय.  

Updated: May 12, 2018, 12:30 PM IST
सुरेश रैनाने केलाय असा रेकॉर्ड, धोनी आणि कोहलीही नाही करु शकले title=

मुंबई : आयपीएलच्या सर्व सिझनमध्ये आपल्या खेळात सातत्य राखणाऱ्यांपैकी सुरेश रैना हा एक खेळाडू आहे. आता अशा मुक्कामावर पोहोचलाय जिथे महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीदेखील पोहोचू शकले नाहीत. असा इतिहास करणारा सुरेश रैना आयपीएलमधील पहिला बॅट्समन बनलाय.  त्याने आयपीएलच्या प्रत्येक सिझनमध्ये ३०० हून अधिक रन्स केले आहेत. याचा अर्थ प्रत्येक सिझनमध्ये त्याने आपल्या टीमसाठी महत्त्वाचे योगदान दिलय. काल लगावलेल्या अर्धशतकासोबत आयपीएलमध्ये ३४ अर्धशतक लगावणारा बॅट्समन तो ठरलाय.  

सर्वाधिक स्कोअर

जयपुरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये चेन्नईची सुरूवात खास झाली नाही. अशावेळी रैनाने ३५ बॉल्समध्ये ५२ रन्सची खेळी करत टीमचा स्कोअर बोर्ड हलता ठेवला. या स्कोअर मुळे ४८५३ रन्स मिळवत तो सर्वात पुढे पोहोचलाय. या आयपीएल सिझनमध्ये रैनाने १० मॅचमध्ये ३१३ रन्स बनविले आहेत. राजस्थानच्या संघाविरुद्ध त्याने १९ डावात ५५७ रन्स बनविले.  हा कोणत्याही बॅट्समनपेक्षा सर्वाधिक स्कोअर आहे.