शेर कभी बूढा नही होता! Suresh Raina चा अप्रतिम कॅच पाहिलात का?

सुरेश रैनाने उत्तम फिल्डींगचा नमुना दाखवत कॅच घेतला.

Updated: Sep 29, 2022, 01:33 PM IST
शेर कभी बूढा नही होता! Suresh Raina चा अप्रतिम कॅच पाहिलात का? title=

मुंबई : शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स आणि ऑस्ट्रेलिया लीजेंड्स यांच्यात सामना खेळला गेला. पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नसला तरी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यानचा असा एक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळाला जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये सुरेश रैनाने उत्तम फिल्डींगचा नमुना दाखवत कॅच घेतला. ज्याची सगळीकडे चर्चा होतेय. 

डावातील 16 व्या ओव्हरमध्ये अभिमन्यू मिथुन गोलंदाजी करत होता आणि त्याने बेन फुल टॉस टाकला. चेंडू फलंदाजापासून दूर होता पण त्याने पॉइंट साईडने शॉट खेळला. त्याठिकाणी सुरेश रैना उपस्थित होता. चेंडू रैनापासून चांगलाच दूर होता पण रैनाने त्याच्या हवेत झेप घेत उत्तम असा कॅच घेतला. या कॅचनंतर सर्व खेळाडूंनी त्याला मिठी मारली. झेल घेतल्यानंतर त्याच्या बोटाला दुखापतही झाली. पण त्यापुढील माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पावसामुळे थांबला सामना

या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर इंडिया लिजेंड्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या कर्णधार शेन वॉटसन आणि अॅलेक्स डूलन यांनी चांगली फलंदाजी केली. दोघांनीही 7 ओव्हरमध्ये 60 रन्सपर्यंत मजल मारली. यानंतर बेन डंकनेही जोरदार फलंदाजी केली आणि रैनाच्या शानदार झेलमुळे 46 रन्स केले.

17 व्या ओव्हरमध्ये पावसामुळे खेळ थांबवावा लागला, त्यावेळी कॅमेरून व्हाईट आणि ब्रॅड हॅडिन अनुक्रमे 6 आणि 1 रन्सवर खेळत होते. भारताकडून अभिमन्यू मिथुन आणि युसूफ पठाणने 2-2 तर राहुल शर्माने 1 विकेट घेतली. दरम्यान आज सामना पुन्हा 3:30 वाजता सुरू होईल जिथे सामना थांबवण्यात आला होता.